ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी याठिकाणी जेवणातून तिघांचा मृत्यू झाला आहे. चौथ्याचा जीव वाचवण्याचा संघर्ष सुरू आहे तर पाचव्याची चौकशी सुरू आहे, याठिकाणी जेवणात मशरुम खाऊ घातले होते.
हे कशामुळे झाले याबाबत अजून माहिती समोर आली नाही. या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. पोलीसही यामुळे हैराण झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, गेल आणि डॉन पॅटरसन त्यांच्या सुनेकडे जेवायला गेले. त्यांची सून लिओनगाथा या गावात राहते. हे गाव ऑस्ट्रेलियात मेलबर्नपासून जवळ आहे. त्यांच्यासोबत एरिनच्या बहिणीचे कुटुंबही जेवायला होते.
असे असताना जेवल्यानंतर या घरातील चार लोक थेट रुग्णालयात गेले. त्यांना गॅस्ट्रो झाल्याचा संशय होता. मात्र थोड्याचवेळात परिस्थिती गंभीर झाली. त्यांना मेलबर्न येथे एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
याठिकाणी हिथर (66) गेल (70) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉन (70) यांचाही मृत्यूही झाला. इयान (68) यांची प्रकृती गंभीर आहे. ते आता यकृत ट्रान्सप्लान्टची वाट पाहत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यांनी Death cap mushrooms खाल्ले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र एरिनला काहीही झालेलं नाही. तपास अधिकाऱ्यांच्या मते जे पदार्थ पाहुण्यांना वाढले तेच एरिनने खाल्ले का याबद्दल ते साशंक आहेत. यामुळे पोलीस तपास करत आहेत.
घातपाताची शक्यता अद्यापही नाकारता आलेली नाही. सध्या मृत्यूचे कोणतेही कारण स्पष्ट नाही. असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा सध्या तपास सुरू आहे. पोलीस अनेकांची चौकशी सध्या करत आहेत.