kirit somaiya : भाजप – शिवसेनेतील वाद आता आणखीनच टोकाला गेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच अशातच आणखी एक मोठी माहिती समोर येतं आहे.
शुक्रवारी किशोरी पेडणेकरांनी एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी चौकशी केली. दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक झाली.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. अशातच किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
किशोरी पेडणेकरांनी सासूबाईंच्या निधनासाठी सोमय्यांना जबाबदार धरलं आहे. बातम्यांच्या आघातामुळे पेडणेकर कुटुंबातील एकाचा बळी गेला आहे. सोमय्यांच्या आरोपांमुळेच सासूचं निधन झाल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. यामुळे आणखीनच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकरांनी म्हंटलं आहे की, सोमय्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या बातम्या पाहून सासूबाईंच्या मनावर परिणाम होत होता. त्यांचं वय नक्कीच होतं. बातम्या ऐकून त्या घाबरल्या, त्यांना त्रास सुरू झाला. याचं भांडवल करत नाही पण फॅक्ट सांगत आहे.’
दरम्यान, माझा कुटुंबातील एक बळी घेतला. तरीही मी 1 नोव्हेंबरला चौकशीला सामोरे जाणार, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. एवढंच नाहीतर तर माझ्यावरील SRA घोटाळ्याचे आरोप खोटे आहेत. या संदर्भाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर