फरीदाबादमधील एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या पायखालची जमीन सरकली असेलच. या व्हिडिओमध्ये चक्क आईने आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दारात नेल्या असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. (faridabad boy video viral)
आई आपल्या मुलाशी असे वागू शकेल का? असा सवाल सध्या उपस्थित होतं आहे. नशीब चांगले म्हणून या घटनेत मुलाचा जीव वाचला आहे. मात्र आईची एक लहान चूक मुलाच्या जिवावर बेतली असती. चला तर मग जाणून घेऊ या.. नेमका प्रकार काय घडला आहे.
ही घटना आहे दिल्लीला लागूनच असलेल्या फरीदाबादमधील. (faridabad) मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सहा किंवा सात फेब्रुवारीची आहे. आईने मुलाला साडीला बांधून इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लटकवले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतं आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ फरिदाबादच्या सेक्टर-82 येथील फ्लोरिडा सोसायटीचा आहे. मात्र त्या महिलेने असे का केले? त्या मागील खरं कारण काय? याबाबत त्या महिलेला विचारले असता महिलेने सांगितलेले कारण वाचून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.
तसेच त्या महिलेला याबाबत विचारले असता. तिने सांगितले की, ‘नवव्या फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये कपडे पडले होते. त्या घराला टाळे असल्याने खाली जाऊन ते आणू शकत नव्हती. म्हणून तिने तिच्या मुलाला साडीला बांधले आणि खाली सोडले.
मात्र शुल्लक गोष्टीसाठी मुलाचा जीव धोक्यात घालणे चुकीचे आहे. साडीची गाठ थोडीजरी ढीली झाली असती तर तो मुलगा जमिनीवर आदळला असता आणि ठार झाला असता. मात्र नशिबाने तसं झालं नाही. सध्या या महिलेला सोसायटीने हे कृत्य केल्याने नोटीस पाठविली आहे.
दरम्यान, समोरच्या इमारतीत राहणाऱ्यांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच सोसायटीने या महिलेला हे कृत्य केल्याने नोटीस पाठविली देखील पाठवली आहे. सोशल मिडियावर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या
‘हर हर महादेव’ म्हणत ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित; पहा इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक
‘खूप मनापासून हा लूक करून गेले होते’, लतादीदींच्या लुकमधील फोटो शेअर करत हेमांगी कवी झाली भावूक
आॅस्ट्रेलियाविरूद्ध मी जिंकवलं पण त्याचं श्रेय मात्र दुसऱ्यांनी घेतलं’; अजिंक्य रहाणे का भडकला?
निर्लज्जपणाचा कळस! लाखाची लाच घेताना पकडली गेली महिला अधिकारी, तरी खिदीखिदी हसत म्हणाली…






