बीड (beed) जिल्ह्याच्या अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील बागझरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अंड्याची भाजी खाल्ल्याने विषबाधा होऊन आई, दोन मुलींसह आठ महिन्याचा मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (mother and 3 children died after food poisoning)
बीड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 6 वर्षीय साधना, 4 वर्षीय श्रावणी आणि आठ महिन्यांच्या नारायणचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.२५) रात्री त्यांची पत्नी भाग्यश्रीआणि मुलांनी अंड्याची भाजी खाल्ली. या जेवणातून त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी काशीनाथ धारासुरे यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी मुलगी साधना, श्रावणी आणि लहान मुलगा नारायण यांसमवेत शुक्रवारी रात्री जेवण केलं होतं. जेवण झाल्यानंतर काही वेळातच या सर्वांना मळमळ आणि उलट्याचा त्रास होऊ लागला.
त्यामुळे त्यांना तात्काळ शनिवारी सकाळी चारही जणांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. उपचार सुरु असताना साधना आणि श्रावणी यांचा आधी मृत्यू झाला. चिमुकल्या नारायणने त्यानंतर तासाभराने प्राण सोडले. तर रात्री ९ भाग्यश्री यांचाही मृत्यू झाला.
शनिवारी दुपारी तिन्ही मयत चिमुकल्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता बागझरी येथे तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. धारासुरे कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संबंधित सर्वजण अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी गावातील रहिवासी होते. याप्रकरणी काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर घटनेची नोंद केली आहे. संबंधित चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
‘मी काहीही चोरलेले नाही…, मात्र, तुम्ही भिकारी’, घरात काहीच न मिळाल्यानं चोराची सटकली
HR आणि कामगारामध्ये तूफान राडा, HR ची गाडी अडवून फोडली; वाचा नेमकं काय घडलं
संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस; खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखवली खंत
जी पोर वाघाशी आणि गव्याशी झुंज देतात त्यांना तुम्हाला तुडवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टी कडाडले