shinde group : एकनाथ शिंदे यांचा बंड शिवसेनेसाठी चांगलाच धोकादायक ठरला आहे. पाहता – पाहता आता तर थेट बाळासाहेब जवळच्या व्यक्तींनी देखील शिंदे गटाची वाट धरली असल्याच पाहायला मिळतं आहे. यामुळे आता आणखीनच शिवसेनेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
आमदार, खासदार, नगरसेवकांपाठोपाठ आता तर बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू असलेले निष्ठवान देखील शिंदे गटात सामील होतं आहे. यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे चांगलेच पेचात सापडले आहेत. आगामी निवडणुकांसाठी ठाकरे पिता – पुत्रांनी कंबर कसली आहे.
कालच कालच बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर धक्का दिला आहे. थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे. तर आता आणखी एका निष्ठावान व्यक्तीने ठाकरेंची साथ सोडली आहे.
नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चंपासिंग थापा आणि मोरेश्वर राजे यांनी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंची साथ सोडली आहे. मोरेश्वर राजे हे खूप वर्षे बाळासाहेब ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत होते. 35 वर्ष मातोश्रीचे फोन कॉल उचलण्याचं काम देखील त्यांनी केलं होतं.
तर दुसरीकडे, थापा हे अनेकांनी दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे विनम्रपणे उभे असल्याचं पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना सभेदरम्यान पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत होते.
दरम्यान, आता बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू देखील शिंदे गटात जातं असल्याने ठाकरे गटात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट देखील चांगलाच कामाला लागला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील कंबर कसली आहे.