Food poisoning : नवरात्र उत्सवामध्ये अनेक लोक देवीचा नऊ दिवस उपवास करतात. ग्रामीण भागात, शहरात मोठ्या प्रमाणात त्यामुळे उपवासाचे अन्नपदार्थ खरेदी केले जातात. उपवासाच्या या पदार्थांमध्ये शाबूतांदूळ, भगर (वरई) यांचा समावेश असतो. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि कन्नड या भागात भगर खाल्ल्याने अनेक लोकांना विषबाधा झाली आहे. वैजापूर, गंगापूर या भागात तब्बल १६० जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यातील १०८ जण बरे झाले. आणि ५२ जणांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अचानक भगर खाल्ल्याने ज्यांना उलट्या, त्रास झाला. ते नागरिक तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जेव्हा डॉक्टरांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा, रुग्णांनी भगर खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.
औरंगाबादच्या अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने त्या भागातील सर्व दुकानांतून भगर साठा जप्त केला आहे. तब्बल १२२० किलो एवढा भगर साठा ताब्यात घेण्यात आला. यानंतर प्रशासनाकडून बाधित रुग्णाकडे असणारी भगर आणि दुकानदारांकडे असणारी भगर यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
भगर खाल्ल्याने असंख्य नागरिक बाधित झाले. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विषबाधा झाल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी तपास करून आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, अशी माहिती वैजापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याने औरंगाबादमधील वैजापूर, ‘गंगापूर भागात भगर खाऊ नका, त्यामुळे विषबाधा होईल,’ असे संदेश गावोगावी पसरवले जात आहेत. नागरिकांमध्ये नवरात्र उत्सव काळात भगतचे पीठ व भगरपासून बनलेले पदार्थ खाण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी उपवास काळात घेणे गरजेचे आहे. भगर विकत घेत असाल तर ती धान्य स्वरूपात असावी. रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून भगर विकत घेऊ नये. तसेच भगर ज्या दुकानातून विकत घेत आहात, त्याकडे परवाना आहे का? हे तपासून पहावे. भगर विकत घेतल्यास त्याची पावतीही ठेवावी.
महत्वाच्या बातम्या-
crime news : ‘मुलींना मांडीवर बसवून अश्लील सिनेमे दाखवायचा शिक्षक अन्…,’ वाचून हादरालं
Shirur : पवारांची मोठी फजिती; साखर कारखान्याच्या सभासदांचा रुद्रावतार पाहून सभेतून काढला पळ
Nora Fatehi: पार्कमध्ये डान्स करत होती नोरा फतेही, अचानक वाऱ्याची झुळूक आली अन्…, पहा व्हिडीओ