Share

Monsoon : ‘या’ तारखेनंतर राज्यात पाऊस पडणार नाही; हवामान विभागाने दिली दिलासादायक बातमी

monsoon stop in maharashtra weather department |  राज्यातील विविध भागात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा धक्का बसला आहे. हा पाऊस कधी थांबणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस जाण्यासाठी अनुकूल असलेले वातावरण तयार झाले आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. २२ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच ही दिलासादायक बातमी असणार आहे.

बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मान्सून पश्चिम वायव्य दिशेकडे वेगाने सरकत आहे. २२ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशनमध्ये आणि २३ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र डीप डिप्रेशनमध्ये जाणार आहे.

तसेच २४ तारखेला सीतरंग चक्रीवादळामध्ये रुपांतरीत होणार आहे. त्यामुळे २५ ऑक्टोबरला ओडिशा किनारपट्टीला लागून पश्चिम बंगाल-बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहचण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून मान्सून लवकरच जाणार आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पण परतीचा पाऊस लांबण्याची काही कारणे सुद्धा आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार झाले होते. तसेच आजूबाजूला वाहणारी वारे शहरी भागाकडे वाहत असतात, त्यामुळे यंदा परतीचा पाऊस लांबला होता.

राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यावेळी राज्यात १२३ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांमध्ये बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात वादळे निर्माण व्हायची. पण आता अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे यंदा जास्त पाऊस पडला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Moti Soap : दिवाळीत वापरला जाणारा मोती साबण का आहे एवढा प्रसिद्ध? वाचा त्याची जन्मकहाणी
Eknath shinde : मुख्यमंत्री शिंदेंना निवडणूकीत पाडू शकतो अशा माणसाची शिवसेनेत घरवापसी; शिंदेंची चिंता वाढली
Eknath shinde : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कर्जमाफीची मोठी घोषणा

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now