मोहम्मद सिराजने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या क्रमवारीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर-1 गोलंदाजाचा मुकुट पटकावला आहे. ज्या खेळाडूला टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी कधीही योग्य मानले जात नव्हते. तो खेळाडू 729 गुणांसह एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1 गोलंदाज बनला आहे.
त्याला इथपर्यंत पोहोचवण्यात त्याच्या वडिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज ते हयात असते तर आपल्या मुलाचे कर्तृत्व पाहून त्यांना फार आनंद झाला नसता. पण आज तो कुठेही असला तरी त्याची छाती अभिमानाने फुगली असती. सिराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याविषयी बोलत आहे.
आयसीसीने बुधवारी पुरुषांची एकदिवसीय खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा दबदबा पाहायला मिळत आहे. तो ७२९ गुणांसह वनडेमधला नंबर-1 गोलंदाज बनला आहे.
त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलहूड आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. अलीकडच्या काळात त्याने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. ज्याचे बक्षीस म्हणून त्याला नंबर-१चा मुकुट मिळाला आहे.
अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना मोहम्मद सिराजच्या हैदराबाद येथील स्थानिक मैदानावर खेळला गेला. टीम इंडियामध्ये असताना तो त्याच्या स्थानिक प्रेक्षकांसमोर खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.
त्याचा सामना पाहण्यासाठी त्याचे सर्व कुटुंबीय व नातेवाईक आले होते. पण त्यांचे वडील गौस मोहम्मद हजर नव्हते, कारण ते आता या जगात नाहीत, पण आपल्या मुलाचे हे यश पाहून त्यांना वरून हसू येत असेल. ते खूप खुश असतील.
मोहम्मद सिराज आज ज्या टप्प्यावर आहे. या सर्वांमध्ये त्यांच्या वडिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. एक काळ असा होता की ते आपल्या मुलाला पूर्ण पाठिंबा देत असत. त्यांना आपल्या मुलाला टिम इंडीयाच्या निळ्या जर्सीत खेळताना बघायचे होते.
सिराजला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे, तो वडिलांकडून पैसे घेऊन त्याच्या दुचाकी बजाज प्लॅटिनामध्ये 60 रुपयांचे पेट्रोल टाकायचा आणि सरावाला पोहोचायचा. अथक परिश्रमानंतर आज तो इथपर्यंत पोहोचला आहे.
अम्मी म्हणाली होती की तू फक्त तुझ्या वडिलांची इच्छा पूर्ण कर.सिराजच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते, त्याला परत यायचे होते, पण त्याने स्वत:ला सांभाळले आणि वडिलांच्या मृत्यूनंतरही भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
परत आल्यानंतर तो थेट कबरीजवळ गेला आणि त्याने वडिलांशी मुक संवाद साधला. सिराजचा एक संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो असे म्हणताना ऐकू येतो. “ज्यांनी मला सर्वात जास्त पाठिंबा दिला ते अब्बू या जगातून जाणे माझे सर्वात मोठे नुकसान आहे.
''अम्मी ने बोला था तूं बस अपने अब्बू की ख्वाहिश पूरी कर'', मोहम्मद सिराज का आसान नहीं है ODI में नंबर-1 गेंदबाज बनने तक का सफर…#ICCRankings #MohammedSiraj #oldvideo #IndianCricketTeam pic.twitter.com/qjbzSt0dd1
— Rubin Ahmad (@rubinahmad92) January 25, 2023
मी भारतासाठी खेळावे आणि देशाला गौरव मिळवून द्यावे, अशी त्यांची इच्छा होती. माझ्या मनात एकच गोष्ट आहे की मी त्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो. अशा परिस्थितीत संघातील सर्व सदस्यांनी मला साथ दिली. यामुळे मला बरे वाटले. त्यांनी मला काहीही त्रास होऊ दिला नाही. अम्मी मला म्हणाली होती की तुला तिथेच ऑस्ट्रेलियामध्ये राहून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे मला अम्मीने सांगितले होते.