पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. नुकतेच त्यांनी संसदेत काँग्रेस वरती अनेक आरोप केले होते. त्यातच आता 2014 च्या एका घटनेवरून त्यांनी पुन्हा काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी पंजाबमधील जालंधरमध्ये एका सभेत होते, त्यांनी मंचावरून 2014 च्या घटनेची आठवण काढत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले,2014 च्या लोकसभा निवडणुका होत्या. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि भाजपने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्ह्णून घोषित केले होते, निवडणूक प्रचारासाठी मी देशभर फिरत होतो. राज्याचा मुख्यमंत्री असल्याने गुजरातचे कामही करत होतो. त्यावेळीचा एक किस्सा आठवतो असे मोदी म्हणाले.
त्यांनी सांगितले की, हे कसे लोक आहेत? यांचे चारित्र्य कसे आहे? तुम्ही हैराण व्हाल, त्यावेळी, काँग्रेसचे नेते आणि युवराजांचा अमृतसरमध्ये एक कार्यक्रम होता. त्यांच्यासाठी मला हेलिकॉप्टरमधून उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले होते. असे मोदी म्हणाले.
त्यामुळे पठानकोठला पोहचण्यासाठी दीड तास उशीर झाला होता. यानंतर पठानकोटवरुन उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले. यामुळे हिमाचलमधील दोन कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. विरोधकांना त्रास देणे काँग्रेसच्या नितीमध्ये असल्याचा घाणाघात मोदींनी केला आहे.
तसेच म्हणाले, पंजाब सीमेवर असलेले राज्य आहे. यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी महत्त्वाची आहे. पंजाबला अशा सरकारची गरज आहे. जी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसोबत महत्वाची पावलं उचलेल. पंजाबच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कोणतेही महत्वाचे पावलं उचलत नाही.
ज्यांना काम करायचे असते त्यांच्या अडचणी वाढवण्यात येतात. यामुळेच कॅप्टन यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. कॅप्टन यांनी सांगितले होते की, पंजाबचे सरकार भारत सरकारद्वारे चालवण्यात येत होती. भारत सरकारसोबत कॅप्टनने काम केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले असल्याचा घाणाघात मोदींनी यावेळी केला आहे.
जालंधर मधील रॅलीदरम्यान मोदींनी गांधी घराण्यावर निशाणा साधला. म्हणाले, काँग्रेसची सरकारे एका कुटूंबाच्या रिमोट कंट्रोलने चालवली जातात. आज काँग्रेसची अवस्था बघा. हा पक्ष तुटत चालला आहे, यामध्ये अंतर्गत भांडणे आहेत. ज्या पक्षात इतकी भांडणे आहेत, तो पक्ष पंजाबला स्थिर सरकार देऊ शकत नाही. असे मोदी म्हणाले.