Share

‘भारत माता की जय’ म्हणताच आलेला जोश मोदीजी जिंदाबाद म्हणताच उतरला, व्हिडीओ व्हायरल

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहिम गंगा सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत मोदी मंडळातील चार नेत्यांना युक्रेंनजवळील देशात पाठवण्यात आले आहे. हे नेते युध्दस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम करत आहेत. या विद्यार्थ्यांची वायुसेनेतील विमानातून ही देशवापसी सुरु आहे.

सध्या याच विमान विमानातील एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत भारतीय वायूदलाच्या विमानात मायदेशी रवाना होण्यासाठी युक्रेनजवळील राष्ट्रांतून बसलेले भारतीय विद्यार्थी, नागरिक दिसत आहेत. या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि थकवा सुध्दा दिसत आहे.

अशा स्थितीतच माईकमधून “भारत माता की…” असा जोरदार आवाज येतो. यावर सर्वजन लगेच उत्साहात “जय..” असे म्हणताना दिसतात. परंतु थोड्याच वेळात माननीय मोदीजी जिंदाबाद.. माननीय मोदीजी जिंदाबाद… असा आवाज येते. यावर मात्र सर्वजन काहीच प्रतिसाद देत नाहीत. मुलांचा आवाज देखील या घोषणेला बारीक होतो.

या घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ माजी आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. या व्हिडीओला “व्वा बच्चों व्वा…” असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकरी चांगलेच हसत आहेत. मोहीम गंगाला उशीर झाल्यामुळे युक्रेंनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मिडीयाच्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून 35 विमाने निघण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात एअर इंडियाची 14, एअर इंडिया एक्स्प्रेसची 8, इंडिगोची 7, स्पाइसजेटची 1, विस्ताराची 3 आणि भारतीय हवाई दलाची 2 उड्डाणे आहेत.

केंद्र सरकारने या मोहीमेअंतर्गत 80 उड्डाणे तैनात केली आहेत. या मिशनवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. मुख्य म्हणजे , भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी रशिया सहा तास युक्रेनवर हल्ला करणार नाहीये. या काळात सर्व भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या
मुंबईची दक्षा अडकली युक्रेनमध्ये, आईवडिलांना फोन करुन म्हणाली, पप्पा मला वाचवा, इथं…
काकाच्या मुलीवर प्रेम करणे पडले महागात, काकाने ‘असा’ काढला पुतण्याचा काटा, वाचून धक्का बसेल
राजकारणात शंभरातले पाचच लोक यशस्वी होतात, बाकीचे सतरंज्या टाकून.., इंदुरीकरांचा तरुणांना भन्नाट सल्ला
पत्नीच्या पहिल्या लग्नाचं सत्य समोर येताच पतीनं संपवलं जीवन, पोलिसांच्या हाती लागला ‘तो’ व्हिडीओ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now