बॉलीवूडमध्ये एकदम बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून राखी सावंतला ओळखले जाते. राखी सावंत कायमच तिच्या धाडसी आणि विचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राखी सावंतबद्दल आता एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. (Modiji you have ruined my life; Actress makes serious allegations against Modi)
कोरोनापासून बचावासाठी राखी सावंतने बूस्टर डोस घेतला. लस घेतल्यानंतर तिला खूप त्रास झाला. रात्रभर झोप लागत नाही, असं म्हणत तिने पंतप्रधानांवर पण आरोप केला आहे. पत्रकारांशी बोलताना तिने याबाबत वक्तव्य केले.
सोमवारी राखी सावंतने विमानतळावर जात असताना पत्रकारांशी बातचीत केली. तेव्हा ती म्हणाली की, ‘मोदीजी तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मला रात्रीची झोप लागत नाही. मी कितीतरी दिवस रात्री झोपलेली नाहीये.’
‘माझ्या हृदयाची धडधड वाढत आहे. माझे शरीर वेगवेगळ्या गोष्टी मागत आहे. मी अस्वस्थ झाली आहे. बूस्टर डोस घेतल्यापासून मला काय होते तेच कळत नाही. माझा चेहरा सुजलेला आहे,’ असं राखी सावंत म्हणाली.
पुढे ती म्हणाली की, ‘या डोसचे परिणाम बघून मला वाटते की, ६०, ७०, ८० वयाच्या लोकांसाठीच हा डोस असावा. ज्यांना चालता फिरता येत नाही. डोस घेतल्यापासून मी वेड्यासारखी झाली आहे. मला आदिलशिवाय काही सुचत नाही. आताही मी त्यालाच भेटायला चालली आहे. यावरून तुम्ही माझी परिस्थिती काय झाली, याचा विचार करू शकता.’
‘मोदीजी हे कसले इंजेक्शन आहे? यात कोणकोणते प्राणी आहेत हेच मला समजत नाही. यामुळे माझे डोळे सुजले. माझा चेहरा सुजला आहे. मला झोप येत नाही. व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे,’ अशाप्रकारची खळबळजनक विधाने राखी सावंतने त्यावेळी केली आहेत.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का! शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांना फोडले, भाजपात प्रवेश
आम्ही ठाकरे आहोत, कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा आमचा पिंड आहे; ठाकरेंनी ठणकावले
युवराजसोबतचा तो ४५ मिनीटांचा संवाद अन् पंतने झळकावले झंझावाती शतक; युवीने स्वतःच फोडले गुपित