रशियन युक्रेन (Russia Ukraine War) युद्धादरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम खूप अवघड होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा मार्ग शोधला. आज लोकसभेत ऑपरेशन गंगाबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar in Parliament) म्हणाले की, एक वेळ अशी होती जेव्हा सुमीमध्ये विद्यार्थी बसमध्ये बसले होते, तेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. त्यानंतर खुद्द पंतप्रधानांनीच पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकद लावली.(Modi turned the phone on and the firing stopped)
खार्किवमध्ये गोळीबार झाल्याचा भीषण क्षण जयशंकर यांनी लोकसभेत सांगितला. सुमीमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यात गोळीबार सुरू होता. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन केला. त्यावेळी मी तिथेच होतो. खार्किव गोळीबार थांबवण्यासाठी त्यांनी पुतीन यांच्याकडे मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले की, आमच्या विद्यार्थ्यांना धोका आहे. जयशंकर म्हणाले की त्या संभाषणामुळे आम्हाला पुरेसा वेळ मिळाला आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही खार्किव सोडून सुरक्षित क्षेत्रात घेऊन जाता आले.
सुमीच्या एका ठिकाणी विद्यार्थी बसमध्ये बसले होते, आम्ही निघणार होतो आणि पुन्हा गोळीबार सुरू झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी दोन्ही राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. कारण हे दोन्ही लोक दोन्ही बाजूने गोळीबार करत होते. विशिष्ट वेळेपर्यंत आम्हाला वेळ द्या, असे पीएम मोदींनी दोन्ही नेत्यांना समजावून सांगितले. तुम्ही गोळीबार करू नका असे तुमच्या सैन्याला सांगितले तर आम्ही निघू, असे पंतप्रधान म्हणाले.
यानंतर दोन्ही देशांनी गोळीबार थांबवला. मग युक्रेनकडून मदत घेतली आणि त्यांचे संरक्षणही घेतले. याशिवाय रेडक्रॉसची मदत घेतली. त्यानंतर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. जयशंकर यांनी या संकटाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांचे जे हाल झाले आहेत त्यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीत, असे ते म्हणाले.
बहुतेक लोक ट्रेनच्या माध्यमातून बाहेर पडले. विद्यार्थी तेथून बाहेर निघेपर्यंत ट्रेन बंद करू नयेत यासाठी आम्ही युक्रेन सरकारवर दबाव आणला. बाहेरून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरात काम केले आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. कधी कधी असे झाले बस फक्त एकच होती. मग विद्यार्थ्यांनी ठरवलं की कोण जाणार आणि कोण नाही. बरेच लोक थांबले आणि इतरांना जाण्यास सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
ईडीने संजय राऊतांवर कारवाई का केली? शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींनाच विचारला जाब
मोदींनी प्रयत्न केले तरच संपू शकते रशिया-युक्रेन युद्ध, UN चे चीफ म्हणाले, मी सतत भारताच्या संपर्कात आहे
Russia Ukraine war: मोदींचा तो फोटो पुन्हा होतोय व्हायरल, पुतिन यांच्यामागे हात बांधून उभे आहेत मोदी
भारतात परत जायचे असेल तर टॉयलेट साफ करा, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थीनीने सांगितली आपबिती