Share

पंतप्रधान झाले तेव्हाच मोदींनी दाऊदला भारतात आणायला हवं होतं’, गँगस्टरच्या पत्नीनेच व्यक्त केली खंत

सध्या महाराष्ट्र राज्यात दाऊद हा विषय प्रचंड चर्चेत आहे. अनेक राजकीय नेते दाऊदचा संबंध जोडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच गँगस्टर अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी यांनी दाऊदविषयी एक वक्तव्य केले आहे, ज्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

गँगस्टार अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी यांनी पुण्यातील वडगाव पीर येथे ‘साम’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी दाऊद आणि दाऊदच्या नावाने महाराष्ट्रात चालत असणारे राजकारण यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, राज्याच्या राजकारणात ज्यावेळी राजकीय नेते आणि दाऊदचा संबंध हा विषय येतो तेव्हा हा सर्व खेळ वाटतो.

गेले कित्येक वर्ष तेच चाललं असून लोकांना भुरळ घालण्यासाठी हा खेळ खेळला जात आहे. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांचे दाऊदशी संबध असल्याने दाऊदला भारतात आणले जात नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे अनेकांनी समर्थन देखील केले आहे.

तसेच म्हणाल्या, महाराष्ट्र राजकारणात दाऊदच्या नावाने जे राजकारण चालले आहे तो सगळा मला खेळ वाटतो. कित्येक वर्ष झालं राजकारणात तेच चालू आहे. सरळ सरळ लोकांना भुरळ घालण्यासाठी हे चालले आहे. या अशा विषयांमुळे जे कर्तव्य करायचे होते ते काहीही आत्तापर्यंत पार पाडण्यात आलेली नाहीत.

बॉम्बस्फोटात गुन्हेगार असलेल्या दाऊदला कधीच आणायला हवे होते. मात्र, तसे अजूनपर्यंत काही घडले नाही. याबाबत फक्त वारंवार चर्चा होतात आणि लोकांना फसवले जात आहे. राजकारणात जे काही कित्येक दिवस सुरू आहे, ते मला अजिबात पटत नाही. असे त्या म्हणाल्या.

पुढे त्या हेही म्हटल्या की, बोलायला माझ्याकडे भरपूर आहे. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा दाऊदला पाठिंबा आहे. यामुळे दाऊदला पकडण्याची कुणाची हिंमत नाही, आणि फक्त दाऊदला पकडूनच चालणार नाही. या प्रकरणात अनेक अनेक राजकीय नेते, बॅाम्बस्फोटबुद्धीच्या लोकांचा संबंध आहे.

हे सर्व मिळून हा खेळ करत आहेत, आणि त्यांचा या खेळाला पाठिंबा आहे. पण जगाचे या बारीक गोष्टीकडे लक्ष नाही. या प्रकरणाला जग बारकाईने पाहत नाही. यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राची वाट लागली आहे. लोकांचे या गोष्टींकडे लक्ष असले पाहिजे.

या सगळ्यात राज्यातील गरिब जनता, शेतकरी आणि तरूण मंडळी भरडली जात आहेत, याचं मला दुःख वाटत आहे. तसेच त्यांनी यावेळी 1993 च्या बॉम्बस्फोटाती गुन्हेगारांना, दाऊदला पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान झाले तेव्हाच भारतात आणायला हवे होते, अशी खंत देखील बोलून दाखवली.

इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now