मागील काही काळापासून वाढती महागाई, बिघडलेलं अर्थचक्र यामुळे श्रीलंका देश जगभरात चर्चेत आला होता. आता श्रीलंकेतील एका मोठ्या वादाचा थेट संबंध भारताशी जोडला जातोय. भारताच्या पंतप्रधान मोदींनी एका ऊर्जा प्रकल्पासाठी राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांच्यावर दबाव आणला, असा खळबळजनक दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संसद समितीसमोर केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने तो दावा मागे घेतला आहे. (Modi put pressure on the Sri Lankan president to..)
वरिष्ठ अधिकाऱ्याने ज्या प्रकल्पासंबंधी दावा केला, तो प्रकल्प भारताच्या उत्तरेला मुन्नार जिल्ह्यातील ५०० मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. श्रीलंकेच्या सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे (CEB) अध्यक्ष, एम.एम.सी.फर्डिनांडो यांनी हा दावा केला की, राष्ट्रपती राजपक्षे पंतप्रधान मोदींच्या दबावाखाली आहेत, असे त्यांनीच मला सांगितले.
फर्डिनांडो यांनी शुक्रवारी कोलंबो येथील संसदीय समितीसमोर हजेरी लावली. ऊर्जा प्रकल्प अदानी समूहाला देण्यात यावा यासाठी मोदी दबाव आणत आहेत. हा प्रकल्प अदानी समूहाला मिळावा अशी मोदींची इच्छा आहे, या गोष्टी राष्ट्रपतींशी झालेल्या संभाषणात मला समजल्या, असे फर्डिनांडो म्हणाले.
या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. सर्वत्र यावर चर्चा सुरु झाली, वाद वाढल्याने त्या अधिकाऱ्याचा दावा राष्ट्रपती राजपक्षे यांनी फेटाळून लावला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दावा मागे घेतला. या प्रकरणाचे परिणाम गंभीर होतील अशी कल्पनाच जणू श्रीलंकन अधिकारी व राष्ट्रपतींना आली असावी.
समितीसमोर हा धक्कादायक दावा करणाऱ्या फर्डिनांडो यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी स्वत:चे हे विधान मागे घेतले. त्यावर त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की, मला विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांमुळे मी ‘भावनिक’ झालो आणि ज्यामुळे माझ्याकडून चुकीचे दावे करण्यात आले.
सीईबीने यापूर्वी कधीही सरकारी स्तरावर नियमबाह्य आणि अनपेक्षित प्रस्ताव दिलेले नाहीत, असं या प्रकरणावर बोलताना राजपक्षे म्हणाले. राष्ट्रपती राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रपतींनी फर्डिनांडो यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यावेळी हे संभाषण झाल्याचा दावा केला जातोय. परंतु आता राष्ट्रपती राजपक्षे आणि वरिष्ठ अधिकारी फर्डिनांडो यांनी या प्रकरणावर पडदा टाकला असल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या –
“हिंदूंचा नायनाट करण्यासाठी पाकीस्तानने पुढाकार घ्यावा, मुस्लिम देशांनी एकत्र येत त्यांना पाठींबा द्यावा”
ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंना ब्लड कॅन्सर; दीनानाथ रुग्णालयात योद्धा देतोय कॅन्सरशी झुंज
माझी बायको १० वर्षांपासून माझ्यावर रेप करत होती; पतीने केला धक्कादायक खुलासा