भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. हे यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली. मोदींच्या आईचे नाव हिराबेन मोदी असे आहे.(Modi meets 100 year old mother while on tour in Gujarat;)
२ वर्षांनंतर मोदी त्यांच्या आईला भेटायला गेले होते. याआधी मोदी २०१९ मध्ये आईला भेटले होते. यानंतर मोदी कामात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या आईला भेटता आले नव्हते. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर मोदी त्यांच्या आईला भेटायला गुजरात येथे पोहचले.
गुजरात दौऱ्यावर असलेल्या मोदींनी त्यांच्या आईची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी काढलेला फोटो व्हायरल झाला आहे. मोदींनी आईसोबत जेवण केले. त्यांचा आशीर्वाद घेतला आहे.
काल सकाळपासून मोदींनी गुजरातचा दौरा सुरु केला आहे. मोदींनी अहमदाबादमध्ये रोड-शो केला आहे. त्यानंतर मोदी पंचायत संमेलनात सहभागी झाले होते. त्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला. गुजरातमधील पंचायतीमध्ये महिलांचं प्रमाण वाढत असल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. रात्री ९ च्या सुमारास पंतप्रधान मोदी आपली सर्व कामे आटपून घरी गेले. आईसोबत जेवणही केले.
पंतप्रधान मोदी आपल्या आईला भेटायला गेल्यानंतर आसपासच्या लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर मोदी हे आपल्या लहान भावालाही भेटले. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन या सध्या गांधीनगर जवळच्या रायसन भागातल्या निवासस्थानी मोदींच्या लहान भावासोबत राहतात.
महत्वाच्या बातम्या
बॉलिवूडच्या झगागत्या आयुष्यात राहुनही ‘या’ पाच अभिनेत्री जगतात साधे जीवन, पैशांचा आजिबात नाही माज
‘काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहीत असल्यामुळेच मी आधीच भाजपात आलो’; केंद्रीय मंत्र्याचं विधान