Share

PHOTO: मोदींनी बनावट शाळेचे केले उद्घाटन? नेटकऱ्यांनी पुरावे दाखवत उडवली मोदींची खिल्ली

गुजरातमध्ये आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज गांधीनगरमध्ये मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सचे (Mission School Of Excellence) उद्घाटन केले. यादरम्यान पीएम मोदींनी वर्गात विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या लॉन्चिंग कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी म्हणाले, आज शिक्षण व्यवस्था अतिशय स्मार्ट झाली आहे आणि गुजरातच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल दिसून आला आहे. Prime Minister Narendra Modi, Mission School of Excellence, Education System,PHOTO

https://twitter.com/ANI/status/1582627815073411073?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1582627815073411073%7Ctwgr%5Ec0cfe647de5529ef0019a9230d9ff1be688f75c7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fthewirehindi.com%2F229258%2Fgujarat-narendra-modi-school-visit-opposition-alleges-classroom-was-make-shift-setup%2F

पीएम मोदी म्हणाले, आज गुजरात अमृत काळाची अमृत पिढी घडवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. विकसित भारतासाठी, विकसित गुजरातच्या निर्मितीसाठी ही मौल्यवान गोष्ट ठरणार आहे. यावेळी त्यांनी 5G चा उल्लेखही केला. पीएम म्हणाले, आम्ही फर्स्ट जी ते 4जी पर्यंत इंटरनेट सेवा वापरली आणि आता 5जी देशात मोठा बदल घडवून आणणार आहे. ते म्हणाले, जर 4G सायकल असेल तर 5G हे विमान आहे.

पीएम मोदींनी ज्या मॉडेल क्लास रूमचे उद्घाटन केले ते पूर्णपणे बनावट दिसते. फ्लेक्स प्रिंटिंगच्या माध्यमातून बॅनर पोस्टर लावून वर्गखोली घाईघाईने बनवण्यात आल्याचे छायाचित्र पाहून समजते. देशाच्या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे उद्‌घाटन मोदींच्या हस्ते होत असेल तर ते नक्कीच चांगली गोष्ट आहे. अशा निष्काळजीपणाची कारणे काय आहेत? फोटोशूटसाठी अधिकाऱ्यांनी घाईघाईने बनावट क्लासरूम बनवली का, हाही तपासाचा विषय आहे.

https://twitter.com/chandanjnu/status/1582980938388369409?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1582980938388369409%7Ctwgr%5Ec0cfe647de5529ef0019a9230d9ff1be688f75c7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fthewirehindi.com%2F229258%2Fgujarat-narendra-modi-school-visit-opposition-alleges-classroom-was-make-shift-setup%2F

यावर काँग्रेस नेत्यांनीही खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे छत्तीसगड प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव चंदन यादव यांनी लिहिले, ‘काल साहिबांच्या शूटिंगसाठी शाळेचा सेट लावण्यात आला होता. अगदी स्वस्तातल्या सीरियल्सही मोदींच्या बातम्यांसारख्या खोट्या नसतात.

https://twitter.com/chandanjnu/status/1582980938388369409?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1582980938388369409%7Ctwgr%5Ec0cfe647de5529ef0019a9230d9ff1be688f75c7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fthewirehindi.com%2F229258%2Fgujarat-narendra-modi-school-visit-opposition-alleges-classroom-was-make-shift-setup%2F

दरम्यान, उत्तर प्रदेश काँग्रेसने लिहिले की, ‘चित्रपटाचे शूटिंग होणार होते… क्लासरूम प्लायवूडपासून बनवण्यात आली आहे. खिडकी लक्षात बनवायची लक्षात राहिली नाही, तर घाईघाईत रंगरंगोटी करून खिडकी बनवली. हे सगळं करून काय मिळतं, शेवटी सगळ उघड पडत आणि जग हसतं.

पंतप्रधानांनी गुजरातमधील गांधीनगरला भेट दिल्यानंतर आणि तेथील एका शाळेत विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी एकत्र काम करण्याचे आणि त्यांच्या सरकारचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन केले.

केजरीवाल यांनी ट्विट केले की, ‘मला खूप आनंद होत आहे की आज देशातील सर्व पक्ष आणि नेत्यांना शिक्षण आणि शाळांबद्दल बोलायचे आहे. ही आमची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मला आशा आहे की केवळ निवडणुकीच्या वेळी शिक्षण आठवणार नाही. सर्व सरकारे मिळून केवळ पाच वर्षांत सर्व सरकारी शाळा उत्तम बनवू शकतात.

https://twitter.com/RLDparty/status/1582978079034511360?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1582978079034511360%7Ctwgr%5Ec0cfe647de5529ef0019a9230d9ff1be688f75c7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fthewirehindi.com%2F229258%2Fgujarat-narendra-modi-school-visit-opposition-alleges-classroom-was-make-shift-setup%2F

यावर राष्ट्रीय लोकदलानेही खिल्ली उडवत ‘शिक्षणाचे मंदिर कॉपीचे मंदिर झाले आहे’, असे म्हटले आहे. पक्षाच्या ट्विटर हँडलवरून लिहिले आहे की, ’27 वर्षात भाजप गुजरातमध्ये एकही शाळा बांधू शकली नाही जिथे मोदीजींचे फोटोशूट करता येईल… त्यासाठीही फोटोशॉप/फ्लॅक्स वापरावे लागले… हे अत्यंत निंदनीय आहे.’

महत्वाच्या बातम्या-
Pune Police: ‘माझ्या वरच्या फ्लॅटमध्ये मोदींची हत्या करण्याबाबत प्लॅन सुरू आहे’, एका कॉलने पुणे पोलीस हादरले
Narendra Modi: आज सोशल मिडीयावर का व्हायरल होतोय पंतप्रधान मोदींचा जुना फोटो? वाचा यामागचे सत्य
Uddhav Thackeray : शिवसेना सोडणारे खासदार मला म्हणत होते की पुढच्या निवडणूकीत मोदी…; ठाकरेंचा मोठा खुलासा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now