कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 6 कोटी कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे. ईपीएफओच्या सेंट्र्ल बोर्ड ऑफ ट्रस्ट्रीजने पीएफ खात्यावरील व्याज कमी केले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.1% व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच धक्का देणारी आहे. मात्र अद्याप बोर्ड ऑफ ट्रस्ट्रीजने घेतलेल्या या निर्णयाला मंत्रालयाची मंजुरी मिळणे बाकी आहे. मात्र, हे मंजूर झाले तर 40 वर्षांतील सर्वांत कमी व्याज असेल. माहितीनुसार, 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये EPFO ने पीएफ ठेवींवर 8.5% व्याज दिले होते.
कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या पगाराचा काही भाग म्हणजेच 12 टक्के पीएफ खात्यात जमा केला जातो. तर तेवढीच रक्कम त्यांच्या मालकाला या खात्यात जमा करावी लागते. मात्र एम्प्लॉयरच्या योगदानाचा एक भाग कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडात जमा होतो.
ईपीएफओ हा संपूर्ण निधी व्यवस्थापित करत असते आणि प्रत्येक वर्षी या रकमेवर व्याज देत असते. आर्थिक वर्ष 1977-78 या वर्षामध्ये, EPFO ने लोकांना PF ठेवीवर 8 टक्के व्याज दिले. तेव्हापासून ते सतत याच्यावर अवलंबून आहे आणि आता हे 40 वर्षातील सर्वात कमी व्याज आहे.
माहितीनुसार, यापूर्वी 2014-15आणि 2013-14 मध्ये ते 8.75% होते. हे मागील आर्थिक वर्ष 2012-13 मधील 8.5% आणि 2011-12 मधील 8.25% एवढ्या व्याजापेक्षा जास्त आहे. तर, 2018-19 मध्ये 8.65%, 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये 8.55%, 2016-17 मध्ये 8.65% आणि 2015-16 मध्ये 8.8% एवढे व्याज होते.
ईपीओफच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयाला मात्र कामगार संघटनांच्या प्रचंड मोठ्या विरोधांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पुढे मंत्रालय ईपीएफओच्या सेंट्र्ल बोर्ड ऑफ ट्रस्ट्रीजने घेतलेल्या निर्णयाबाबत कोणती घोषणा करेल हे पाहणं आवश्यक राहील.