Share

‘भाजपवाले गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत’ उत्तर प्रदेशचे मोदी लढणार निवडणूक

modi and abhinanadan pathak

पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendr modi) यांच्यासारखे दिसणारे ५६ वर्षीय अभिनंदन पाठक(abhinandan pathak) हे लखनऊमधील सरोजिनीनगर(sarojaninagar) विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अभिनंदन पाठक हे सहारनपूरचे रहिवासी आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यापूर्वी त्यांनी भाजपकडे(bhajap) निवडणुकीसाठी तिकीटही मागितले होते. मात्र त्यांना भाजप पक्षाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.(Modi accuses BJP of not taking BJP seriously)

तिकीटाच्या मागणीबाबत पाठक म्हणतात कि, “मी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(j.p nadda)आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(amit shaha)यांच्याकडे पत्राद्वारे तिकिटाची मागणी केली होती. पण त्यांनी माझ्या पत्राकडे लक्ष दिले नाही. स्वत:ला मोदीभक्त असल्याचे सांगून ते म्हणाले की, भाजप माझ्याकडे दुर्लक्ष करू शकते, पण मी निवडणूक नक्कीच लढवणार आहे.”

अभिनंदन पाठक यांना आपण निवडणूक जिंकणार असा पूर्ण विश्वास आहे. त्यांची अशी इच्छा आहे कि, योगी आदित्यनाथ(yogi adityananth) पुन्हा युपीचे मुख्यमंत्री व्हावेत. यापूर्वी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला मदत म्हणून ते राज्यभर फिरले होते.

तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही आणि त्यांची खिल्ली उडवली होती, असा आरोप पाठक यांनी केला आहे. पाठक यांनी असाही आरोप केला आहे कि, छत्तीसगड भाजपने त्यांना यात्रेदरम्यान राहण्यासाठी जागाही दिली नाही. पाठक यांच्या पत्नीचे नाव मीरा पाठक असे आहे.

आर्थिक पाठबळ नसल्यामुळे पाठक यांच्या पत्नी मीरा यांनी त्यांच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. घटस्फोटानंतर पाठक आपला उदरनिर्वाह ट्रेनमध्ये काकडी विकून केला. पाठक यांना तीन मुलींसह एकूण ६ मुले आहेत.

पाठक यांनी सांगितले कि, “जेव्हापासून मी आर्थिक संकटानंतर घर सोडले तेव्हापासून माझ्या पत्नीने माझ्याशी संपर्क साधला नाही. मला राजकारणी बनून समाजाची सेवा करायची आहे.”

महत्वाच्या बातम्या

एमआयएमच्या वारीस पठाण यांच्या तोंडाला लोकांनी काळे फासले; पठाण म्हणतात…
..त्यानंतर संपूर्ण पराभवाचा दोष माझ्यावर टाकण्यात आला, आता हार्दिक पांड्याने केले गंभीर आरोप

राजकारण

Join WhatsApp

Join Now