Mobile charging, juice jacking, malware/ सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढून घेण्यात आले आहेत. वास्तविक आजकाल चोरटे ज्यूस जॅकिंगच्या (juice jacking attack) माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. ज्यूस जॅकिंग हा एक प्रकारचा सायबर किंवा व्हायरस हल्ला आहे. यामध्ये गुन्हेगार विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या यूएसबी चार्जिंग पोर्टद्वारे कोणत्याही मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा अन्य उपकरणात मालवेअर (ज्यूस जॅकिंग) बसवून वैयक्तिक डेटा चोरतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच हैदराबादमधील एका कंपनीचे सीईओ सार्वजनिक ठिकाणी यूएसबी पोर्टद्वारे आपला मोबाइल चार्ज करत होते. यानंतर त्यांच्या खात्यातून 16 लाख रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. दिल्लीतही यापूर्वी एका महिलेने दिल्ली विमानतळावर असलेल्या यूएसबी चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज केल्यानंतर अशी तक्रार केली होती. यादरम्यान तिच्या खात्यातून 1 लाख 20 हजार रुपये काढण्यात आल्याचा मॅसेज तिला आला. आता सरकारनेही जनतेला याबाबत सावध केले आहे. हे किती धोकादायक आहे आणि यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ज्यूस जॅकिंगचा अर्थ असा होतो की, जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पोर्ट वापरता. या पोर्टद्वारे मोबाईल फोनवर सायबर हल्ले होतात. हे काम पॉवर केबल किंवा डेटा केबल अशा दोन प्रकारे करता येते. सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंग केल्यास हे दोन्ही केबल प्रकार मोबाईल फोनवर संकट म्हणून तुटून पडतात.
लोकं कॅफे, रेल्वे स्टेशन, मेट्रो, बस स्टँड किंवा विमानतळावर जिथे चार्जिंग पोर्ट रिकामे दिसते तिथे ते मोबाईल चार्ज करण्यासाठी ठेवतात. तुमचा मोबाईल चार्ज होतो, पण त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. दरम्यान, तुमच्या फोनवर मालवेअरचा सायबर हल्ला होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या यूएसबी चार्जिंग पोर्टपासून या प्रकारच्या सायबर गुन्ह्याची सुरुवात होते. अशा ऑनलाइन गुन्ह्याला ज्यूस जॅकिंग म्हणतात.
सायबर गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग स्टेशन हॅक करतात. तुम्ही तुमचा फोन चार्जिंगसाठी ठेवताच, तुमच्या फोनच्या USB पोर्टद्वारे तुमच्या फोनमध्ये कोणताही क्रॉलर प्रोग्राम किंवा मालवेअर इन्स्टॉल होईल. यामुळे हॅकरला फोनचा अॅक्सेस मिळेल.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये ही प्रकरणे थांबली होती, मात्र आता बसस्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वर्दळ वाढू लागल्याने सायबर क्राईमची ही घटना वाढू लागली आहे. यापूर्वी एसबीआयसह अनेक बँकांनी लोकांना याबाबत सतर्क केले होते. आता गृह मंत्रालयाच्या सायबर युनिटने या संदर्भात एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.
जेव्हा ‘अलर्ट इंडियन्स’ या सायबर सुरक्षेवर संशोधन करणाऱ्या संस्थेने फेब्रुवारी 2021 मध्ये दिल्ली, बंगळुरू, मुंबई, पुणे आणि हैदराबाद येथे केलेल्या संशोधनात असे आढळून आले की सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशन्सपैकी 22% सुरक्षित नाहीत किंवा ते आधीच हॅकर्सच्या ताब्यात आहेत. दुसर्या अभ्यासात असे आढळून आले की सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोफत वायफाय कनेक्शनपैकी 33% असे होते की ते फोन किंवा लॅपटॉपमध्ये मालवेअर/व्हायरस ढकलत होते, ज्याद्वारे हॅकर्स फोन आणि लॅपटॉपमध्ये प्रवेश करू शकतात.
अशा प्रकारे संरक्षण करा:
– सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या चार्जिंग स्टेशनवर मोबाईल फोन चार्ज करणे टाळा.
– फोन चार्जर, बॅटरी बँक सोबत ठेवा, जेणेकरून चार्जिंग स्टेशनची गरज भासणार नाही.
– आवश्यक असल्यास, वॉल-माउंट केलेल्या इलेक्ट्रिकल सॉकेटमध्ये चार्जर प्लग करून फोन चार्ज करा.
– फोनच्या सेटिंग्जमध्ये USB डीबगिंग अंतर्गत एक पर्याय आहे – Install over ADB, नेहमी बंद ठेवा.
– डेटा चोरीला प्रतिबंध करू शकणारे अँटी व्हायरस सोल्यूशन इंस्टॉल करा.
महत्वाच्या बातम्या-
युक्रेनच्या युद्धनीतीची ‘ती’ 7 पावले ज्यांनी जगाला दिला धक्का आणि पुतिनही झाले परेशान
सावधान! तुम्हालाही काश्मिर फाईल्स मुवीची लिंक आली असेल तर करू नका ओपन, पडेल महागात
चिनी हॅकर्सने लडाखच्या पॉवर ग्रीडवर केला हल्ला, भारताने ‘असा’ हाणून पाडला ड्रॅगनचा डाव