Share

मोबाईल कंपन्या पुन्हा एकदा देणार ग्राहकांना धक्का, रिचार्जच्या शुल्कात करणार तब्बल ‘एवढी’ वाढ

आधीच कोरोनाचा झटका सामान्य लोकांना बसला आहे, त्यात आता सर्वच क्षेत्रात महागाई निर्माण झाली आहे. अत्यावश्यक गोष्टीं खरेदी करणे देखील मध्यम वर्गाला जड जात आहे. दुसरीकडे टेलिकॉम कंपन्यानी देखील नवीन वर्षात आपल्या प्लॅनमध्ये वाढ केली आहे. २०२२ मध्ये मोबाईल सेवा शुल्कांमध्ये वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. मोबाईल सेवांच्या पॅकचे शुल्क पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्यातच जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) आपल्या सेवांच्या शुल्कात २० ते २५ टक्के वाढ केली होती. याआधी पहिल्या वर्षी २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे किंमतीत वाढ झाली नव्हती. मात्र आता २०२२ मध्ये प्रीपेड मोबाईल सेवांच्या शुल्कात पुन्हा वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यापुढे मोबाइलवर बोलणे महागणार आहे. यामागे भारतात येणारं ५जी नेटवर्क कारण असू शकते, असे कारण देण्यात आले आहे.

जाणकारांच्या मते, भारतात टेलीकॉम कंपन्यांमध्ये असलेल्या जबरदस्त स्पर्धेमुळे मागील काही वर्षांमध्ये कंपन्यांनी मोबाइल शुल्कांचे दर वाढवलेले नव्हते, उलट कमीच केले होते. यामुळे टेलीकॉम क्षेत्राला प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. टेलीकॉम कंपन्यांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारला देखील पुढे येत पॅकेज द्यावे लागले आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपली आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मात्र, सरकारची टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL अशी एकमेव टेलिकॉम कंपनी आहे. जिने आपल्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केलेली नाही. बाकी सर्व खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. सरकारी टेलिकॉम आणि खासगी टेलिकॉमच्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत खूप मोठा फरक आहे.

यावरून येत्या काळात, बीएसएनएल जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाची सुट्टी करणारा असल्याचे दिसून येत आहे. बीएसएनएलने १८५ रुपयाचा प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये यूजर्संना डेली २जीबी डेटा दिला जातो. यासोबतच यूजर्संना डेली १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा देखील दिली आहे.

प्रीपेड मोबाईल शुल्क वाढण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. यात टेलीकॉम कंपन्यांनी आपला एआरपीयु वाढण्याची इच्छा, एआरपीयु म्हणजे प्रति ग्राहक सरासरी महसूल, छोट्या कालावधीत महसूल वाढवून प्रति ग्राहक २०० रुपयांपर्यत नेण्याचे उद्दिष्ट, मध्यम कालावधीत महसूल प्रति ग्राहक ३०० रुपयांपर्यत नेण्याचे उद्दिष्ट, नेटवर्क, स्पेक्ट्रमचा खर्च, ५ जी नेटवर्क, स्पेक्ट्रमचा खर्च यासारखे घटक आहेत.

महत्वाच्या बातम्या
सद्दाम हुसैन यांच्या मृत्युच्या १५ वर्षांनंतर त्यांच्या मुलीने केली ‘ही’ विनंती
‘या’ फोटोतील बिबट्याला जर तुम्ही शोधलं तर तुमची नजर आहे खुप चांगली, ९९ टक्के लोकं झालेत फेल
पंतप्रधान मोदींच्या मेट्रो राईडवर नेटकऱ्यांनी बनवले भन्नाट मीम्स, वाचून पोट धरून हसाल

इतर

Join WhatsApp

Join Now