मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर पडसाद अजूनही उमटत आहे. राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच वातावरण तापलं असताना आता प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे चांगलेच चर्चेत आले आहे.
काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानावर सुजात आंबेडकरांनी टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं होतं. सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं होतं.
तर आता ‘दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, असे सुजात आंबेडकर म्हणाले. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. “राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे,” असेही सुजात म्हणाले.
यावर आता मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी सुजातवर काय प्रकारचे संस्कार केलेत? असा सवाल मनसेनं विचारला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सुजात यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, अविनाश जाधव यांनीही सुजात यांच्यावर निशाणा साधला आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना खोपकर म्हणतात, ”मुलगा चांगला बोलतोय, पण, जातीपातीचं राजकारण सुजातला शिकवू नका, अशा प्रकारचे संस्कार मुलाला देऊ नका, असा सल्ला खोपकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला. तसेच, प्रकाश आंबेडकरांकडून सुजातवर काय प्रकारचे संस्कार झालेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वाचा काय आहे वाद.. 2 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत भाष्य केले होते. राज ठाकरे यांच्या विधानावर सुजात आंबेडकरांनी टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं होतं. सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरकरांनी दाखवला हिसका; थेट हाकलून दिले
संजय राऊतांचा ५८ कोटींचा दावा खोटा? किरीट सोमय्यांचं २०१३ चं राज्यपालांना लिहिलेलं पत्र आलं समोर
पंतप्रधान होताच शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबतचा इरादा केला स्पष्ट, म्हणाले ‘…तोपर्यंत शांतता अशक्य’
बुलडोझर बाबाची दहशत! घरी बुलडोझर आलाय कळताच न्यायालयात शरण आला कुख्यात गुन्हेगार