mns workers on vasant more | वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार आणि वसंत मोरे यांची एका लग्नात भेट झाली होती. त्यामध्ये अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. त्यानंतर वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
वसंत मोरे यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला पक्षातून डावललं जातंय, असे म्हटले होते. त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे ते लवकर मनसेला राम राम ठोकणार आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
अशात त्यांचे कार्यकर्ते वसंत मोरेंना मनसे पक्ष न सोडण्याची विनंती करत आहे. तात्यासाहेब तुमच्यासारखा शहर लोकप्रतिनिधी मिळायला भाग्य लागतं. ते भाग्य पुण्याला मिळालं आहे. तुम्ही पक्ष सोडू नका ही नम्र विनंती आहे. तुमच्याकडे बघितल्यावर आम्हाला राज साहेब ठाकरेंची आठवण येते. तुम्ही पुणे शहराचे धर्मवीर आहात, असे वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी कमेंट करत म्हटले आहे.
अजित पवारांच्या ऑफर नंतर वसंत मोरे हे लवकरच पक्ष सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. पण पक्ष सोडण्याबाबत वसंत मोरे यांनी अजून कोणतेही वक्तव्य केलेले नाही. असे असले तरी कार्यकर्ते वसंत मोरेंना मनसे न सोडण्याची विनंती करत आहे.
तात्या एकच विनंती आहे, तुम्ही मनसे सोडू नका, असे एका कार्यकर्त्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, तात्या मनसे पक्ष व राज साहेब ठाकरे यांना सोडून जाऊ नये ही कळकळीची विनंती आहे. कारण तुमचा खुप जबरदस्त आहे आणि तो फक्त मनसे पक्षातच शोभून दिसतो.
तसेच एका कार्यकर्त्याने म्हटले आहे की. तुमची वेळ सध्या थोडी खराब आहे. शांत रहा, संयमी राहा. पण राजसाहेबांना सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय पुण्याची मनसे नेहमी अपुर्णच राहणार आहे. इथे कुठल्याही वांग्याला कोणी विचारत नाही. पुण्यात तुमचाच आवाज राहणार. तर आणखी एका कार्यकर्त्याने म्हटले आहे की, भंगार माणसांमुळे मनसे सोडून जाऊ नका तात्या. ही वेळ निघून जाईल.
महत्वाच्या बातम्या-
शिवरायांवर वादग्रस्त विधान करणाऱ्यांसाठी कायदा करा म्हणणाऱ्या कोल्हेंचा आवाज दाबला; संसदेत माईक केला बंद
Bhagatsing koshyari : भगतसिंग कोश्यारी आणि ‘या’ अभिनेत्रीने बोगस लग्ने लावून…; गंभीर आरोपांनी उडाली खळबळ
जो दगड सोन्याचा समजून वर्षानुवर्षे जपून ठेवला, तो निघाला त्यापेक्षा अधिक मौल्यवान आणि दुर्मिळ