Share

शेवटच्या श्वासापर्यंत नेतृत्त्वाची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिलं ‘शपथपत्र’

raj thackeray

राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. सत्तेसाठी बडे बडे नेते आज पक्षाला घरचा आहेर देतं आहेत. निवडणुकीच्या काळात तर पक्षांतर मोठ्या प्रमाणात होतं असते. यामुळे थेट राजकीय समीकरणच बदलताना पाहायला मिळतात.

विशेष बाब म्हणजे, राजकीय नेते निष्ठा आणि विचार यांना तिलांजली देत सत्तेच्या बाजूने जाताना दिसतात. नेत्यांमागे कार्यकर्ते देखील पक्षांतर करतात. मात्र काही नेते हे कठीण काळात देखील पक्षाची साथ सोडत नाहीत. काही कट्टर कार्यकर्ते देखील पक्षाशी एकनिष्ठ राहतात.

असच एक सकारात्मक उदाहरण आता समोर आलं आहे. एका कार्यकर्त्याने नेत्याबद्दल निष्ठा दाखवित थेट त्या नेत्यालाच स्टॅंपपेपरवर लिहून पक्षासोबत कायम राहीन असं शपथपत्र दिलं आहे. सध्या राज्यात याच शपथ पत्राची चर्चा सुरू आहे.

औरंगाबादमधील बिपीन शंकरसिंग नाईक या मनसेच्या जिल्हा संघटकाने राज ठाकरे यांच्यावर असलेली निष्ठा दाखवण्यासाठी थेट शपथपत्र लिहून दिले आहे. विशेष बाब म्हणजे, नाईक यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांना हे शपथ पत्र दिले आहे.

वाचा शपथ पत्रात काय म्हंटलं आहे..?
‘मा. श्री. राज ठाकरे साहेब…,’ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या विचारांशी व नेतृत्वाशी बांधील राहील. मी पक्षकार्यात स्वत:ला तन-मन-धनाने वाहून घेतलेले आहेच. परंतू कितीही कठीण परिस्थिती उद्भवली तरी आपली साथ सोडणार नाही,’ असं त्यांनी आपल्या पत्रात म्हणलं आहे.

पुढे नाईक यांनी आपल्या शपथ पत्रात म्हंटलं आहे की, मी आपल्याशी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी प्रामाणिक राहून एक सक्रीय निष्ठावान म्हणून स्वत:ला अर्पण करत आहे अशी शपथ नाईक यांनी दिली आहे. सध्या या पत्राची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now