मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. यामुळे मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं आहे. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवून देणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या सभेत यावरूनच राज ठाकरेंनी निशाणा साधला. ‘विरोध म्हणजे एक सापळा असून त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविल्याचा,’ आरोप राज ठाकरेंनी केला होता. यावरूनच चांगलं राजकरण रंगलं आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी एक फोटो ट्विट केला होता.
मोरे यांनी ब्रिजभूषण सिंग यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल केला होता. ‘कुछ फोटो अच्छे भी होते है, और कुछ फोटो सच्चे भी होते है, असे कॅप्शन सचिन मोरे यांनी त्यांच्या ट्विटला दिले होते.
दरम्यान, आता पुन्हा एकदा मनसेकडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. मनते नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी एक फोटो शेअर केला आहे. सोबत एक पोस्टदेखील लिहिली आहे. ‘आता ही बैठक कधी झाली आणि अशा किती बैठका झाल्या #सापळा’ असा प्रश्न त्यांनी ट्विट करून विचारला आहे.
आता ही बैठक कधी झाली आणि अश्या किती बैठका झाल्या #सापळा pic.twitter.com/7KsSZvyznN
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 25, 2022
राज ठाकरेंनी ब्रिजभूषण सिंगांच्या विरोधामुळे दौरा रद्द केल्याचे म्हटले जात आहे. तसेच महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचेही राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यामुळे ही रसद कोणी पुरवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. असे असतानाच आता मनसेकडून जुने फोटो व्हायरल करण्यात येत आहेत.
तर दुसरीकडे, ब्रिजभूषण सिंग हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी सचिन मोरे यांनी शेअर केलेला हा फोटो एका कुस्तीच्या कार्यक्रमातील असल्याचे बोललं जातं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकारला धक्का! अनिल परबांच्या घरी ED ची छापेमारी; आणखी एक मंत्री जाणार तुरूंगात…
दगडफेक आणि काठीने हल्ला करत पंडित नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
“सगळी प्रॉपर्टी विकली तरी या सायकलची सर येणार नाही”, वडिलांच्या आठवणीत वसंत मोरे भावुक
५ वर्षांनंतर पुन्हा भारतात येणार जस्टिन बीबर, गेल्यावेळी अपमान झाल्यामुळे रातोरात सोडला होता देश