सध्या राजकीय वर्तुळात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन गदारोळ माजला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे येथील उत्तर सभेत बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे ३ मेपर्यंत न उतरविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं असून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट मुंब्य्रातील जामा मशीदीसमोरच हनुमान चालिसा म्हणण्याचा इरादा जाहिर केला आहे. यामुळे आता हा वाद आणखी चिघळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
जाधव यांनी याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. ‘३ मे पर्यत मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास ४ मे रोजी सकाळपासून हनुमान चालीसा पठण करण्यासाठी भोंगे लावण्याची परवानगी मुंब्रा पोलिसांकडे पत्राद्वारे मागितली आहे. सोबतच सकाळी ६ वाजता, दुपारी १ वाजता, सायंकाळी ५ आणि रात्री ८ वाजता हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार जाधव केला आहे.
यामुळे आता पोलिस यावर काय निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राजकारण चांगलच तापलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या सभेपूर्वीच राजकारण तापलं आहे. राज यांच्या सभेला तीव्र विरोध करण्यात येत आहे.
या सभेसाठी अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्ते सभा घेण्यावर ठाम आहेत. “पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा”, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे आता वाद आणखीच विकोपाला जाणार असल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा, असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील. मुंबई, पुण्यातील कार्यकर्ते, नेते देखील राज यांच्यासोबत औरंगाबादकडे निघणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
संसदेत बसून खासदार बघत होता पाॅर्न व्हिडीओ; बाजूच्या महीला खासदाराने तक्रार करताच…
मेड फॉर इच…म्हणणाऱ्या कुणाल खेमुला पत्नी साराअली खान कडून जबर मारहाण; पहा व्हिडीओ
संजय राऊतांनी नवनीत राणांची थेट काढली कुंडली; २०१४ मधील भलतीच FIR कॉपी झाली व्हायरल
ढसाढसा रडत रतन टाटांनी सांगीतले, ‘यापुढचे आयुष्य आरोग्यसेवेसाठी देणार’