महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या सभेपूर्वीच राजकारण तापलं आहे. राज यांच्या सभेला तीव्र विरोध करण्यात येत आहे. अशातच एक वेगळी बातमी समोर आली आहे. राज यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक आहे. मात्र अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्ते सभा घेण्यावर ठाम आहेत. “पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा”, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
असे असले तरी, आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत पोलिसांनी ही जमावबंदी लागू केली आहे.
तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमजान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सुचवलं आहे. त्यामुळे आता राज यांची सभा होणार की नाही याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे 1 मे रोजी होणाऱ्या या सभेचा टिझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1518782945989111808?s=20&t=o5w6nGfT4Tj5xy0g3pearg
राज गर्जना या टिझरला नाव देण्यात आलं आहे. तसेच या टिझरमध्ये औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असा उल्लेख कऱण्यात आला आहे. याचबरोबर या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे आपण धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचं सांगत आहेत.
दरम्यान, औरंगाबाद शहरातील पोलिस यंत्रणाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. रविवारी मनसेकडून सभेच्या ठिकाणी पूजन करून व्यासपीठाच्या उभारणीला सुरुवात झाली होती. मात्र, आता जमावबंदीच्या आदेशावर मनसे कार्यकर्ते या भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार? लाजिरवाण्या कामगिरीनंतर ट्विट करत दिले संकेत
मनसेला भाजपचा जोरदार धक्का! माजी जिल्हाध्यक्षच फोडला; करणार भाजपात प्रवेश
ठाकरेंना नडणाऱ्या राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा; विरोधकांसाठी इशारा
राज ठाकरेंची सभा रद्द करावी लागणार? औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी; सरकारचा कठोर निर्णय