मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ‘राजा’ला साथ नको! मनसेकडून ‘एकला चलो रे’चा नारा

राज्यात आगामी मुंबई महानगर पालिका निदवणुकीच्या तोंडावर राजिय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही दिवसांमध्ये मनसेच्या गोटात देखील हालचालींना वेग आला होता. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

याचे कारण असे की, अलीकडे भाजप नेते आणि शिंदे गटातील नेते हे सतत राज ठाकरेंच्या भेटीसाठी जातं होते. यामुळे भाजप – मनसेच्या युतीचे स्पष्ट संकेत दिसतं होते. याचबरोबर राज ठाकरे यांनी डबे जोडण्याचं काम सुरू झालंय असं विधान केलं होतं. त्यामुळे या तिन्ही पक्षांची युती होणार असल्याचं सांगितलं जात होतं.

मात्र अशातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसेने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. यामुळे आता भाजप – शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

याचबरोबर देशपांडे यांनी सांगितलं आहे की, आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागांवर मनसेचे उमेदवार उभा करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभा करणार आहे.

मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप युती तुटली खरं..! मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतांची जागा भाजप कशी भरणार? असा सवाल उपस्थित झालाय. यामुळेच भाजप मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातं जातं. मात्र आता मनसेने युती करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, मनसे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील सर्वच मुख्य महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची चिन्हं आहेत. कारण आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत, असं देशमुख सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचा बडा नेता पवारांच्या भेटीसाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वर; वाचा नेमकं बंद दाराआडं काय घडलं?
CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..
धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून CM शिंदे उतरले, म्हणाले, ‘गाडी आपण नवी घेऊ, काळजी करू नकोस’
प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?