mns on gautami patil dance |प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी गेल्या काही महिन्यांपासून खुप चर्चेत आहे. ती लावणीच्या नावाखील अश्लील हातवारे करत नृत्य करते, अशी टीका वारंवार तिच्यावर होताना दिसून येत आहे. ती लावणी करताना चुकीच्या पद्धतीने हातवारे केल्याचे समोरही आले होते.
कंमरेच्या खाली नेसलेली साडी, अंगविक्षेप, गलिच्छ हातवारे या सगळ्या गोष्टींमुळे गौतमीवर वारंवार टीका केली जात आहे. अनेक लावणी कलाकार आणि नेटकऱ्यांनी सुद्धा तिला धारेवर धरलं आहे. आता या वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा भूमिका घेतली आहे.
मनसेच्या नवनिर्माण सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्यांनी गौतमी पाटीलला आळा घाला, नाहीतर गृहमंत्रालयाच्या काचा फोडू असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता गृहमंत्रालय त्यावर काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
विकृत डान्सर गौतमी पाटील हिच्या विरुद्ध Ipc Act प्रमाणे कलम ५०९ दाखल करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात चालु आसलेला अश्लील नंगानाच यावर गृहमंत्रालयकडून तत्काळ बंदी आणावी अन्यथा गृह मंत्रालयाच्या काचा फोडायला मागे पुढे पाहणार नाही, असे मनसे नेते सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे.
#गौतमी_पाटील pic.twitter.com/kYEzNc30OR
— Siddheshwar kakde Adhikrut- (@mns_club) November 24, 2022
तसेच सिद्धेश्वर काकडे यांनी मुंबई पोलिस महांसचालकांना एक पत्रही लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी गौतमी पाटीलवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, महोदय, वरील विषयी अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की, राज्यात गौतमी पाटील हिच्या डान्सचे शो चालु आहेत. या शो मध्ये डान्सर गौतमी पाटील ही अश्लील हावभाव आणि अश्लील चाळे करत आहे.
जो पर्यंत गौतमी पाटील हिच्यावर कार्यवाही होणार नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही !!! pic.twitter.com/JzHqyoEhUq
— Siddheshwar kakde Adhikrut- (@mns_club) November 24, 2022
तसेच याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून व अश्लीलरित्या अंग प्रदर्शन करून हावभाव करीत आहे. यामुळे महाराष्ट्रात चुकीचे वातावरण निर्माण होत आहे. व याचे वाईट परिणाम राज्यातील तरुणावर होत आहे. म्हणून गौतमी पाटील हिच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
amravati : आईची शेवटची इच्छा होती मुलाच्या हातून चहा प्यायचा! पण मुलगा आलाच नाही; आईनं वृद्धाश्रमात सोडला जीव
kartik aaryan : ऋतिक रोशनच्या बहीणीसोबतच्या अफेयरवर कार्तिक आर्यनने सोडले मौन; केला मोठा खुलासा
Karnatak : बेल्जियमची पोरगी भारतातल्या रिक्षावाल्याचा भोळ्या स्वभावावर झाली फिदा; भारतात येऊन बांधली लग्नगाठ