आज सर्वत्र शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. परंतु या जयंतीला आमदार अमोल मिटकरी यांनी विरोध केला आहे. त्यांनी केलेल्या या विरोधावर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी खडसर भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीवरुन या दोघांच्यात एका चर्चेदरम्यान शाब्दिक वाद पाहिला मिळाला आहे.
नुकत्याच एका वृत्तवाहिनीसोबत झालेल्या चर्चासत्रात, “शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे. रोज होत असली तरी हरकत नाही पण तिथीनुसार साजरी होताना दिसतेय यामध्ये व्होट बँकचं राजकारण आहे.” अशी टीका मिटकरी यांनी केली. यावेळी अमेय खोपकर देखील तेथे उपस्थित होते.
त्यामुळे त्यांनी “मी मिटकरींच्या वक्तव्यांना फारसं महत्व देत नाही. आजचा दिवस सण साजरा करण्याचा आहे. मिकटरींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. आपण दरवर्षी दिवळी, गणपती आणि हिंदू धर्माचे सण साजरे करतो ते तारखेनुसार साजरे करत नाही. महाराष्ट्रातील नव्हते, देशातील नव्हे जगातील सर्व लोकांसाठी छत्रपती शिवाजी महारांची जयंती हा एक सण आहे. आम्हीही तो सण म्हणूनच साजरा करतो,” असे प्रत्युत्तर मिटकरी यांना दिले.
यानंतर पुन्हा “त्यांचा वाढदिवस ते तिथीप्रमाणे साजरा करतात का विचारा,” असे वक्तव्य मिटकरी यांनी केले. परंतु, “३६५ दिवस शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे,” असे खोपकर यांनी मिटकरींना म्हटले. पुढे पुन्हा “राहिला प्रश्न माझ्या वाढदिवसाचा तर माझा वाढदिवस म्हणजे सण नसतो. मिटकरी उगाचं फालतू राजकारण करु नका. तुम्हाला घाणेरडी सवय आहे. दरवेळी काहीतरी फालतू राजकारण करता. उगाच काहीतरी वक्तव्य करायचं, राजकारण कराचं आणि प्रसिद्धीमध्ये राहायचं,” अशी टीका खोपकर यांनी केली.
यावर संतप्त होऊन “नीट बोला नीट, मी फालतू वक्तव्य करत नाही,” असे मिटकरी यांनी खोपकर यांना सांगितले. मात्र “गप्प बसा हो तुम्ही. तुम्हाला काही अक्कल आहे का?,” अशा भाषेत खोपकर यांनी मिटकरींना सुनावल. पुढे हा वाद टोकाला जात, “तुम्ही हुकूमशाहा आहात का? मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे,” असे मिटकरी म्हणाले. यावर “फालतू तुम्ही आहात. तुम्हाला अक्कल पाहिजे. स्वत:ला शिवभक्त म्हणवता तुम्ही,” अशी खोचक टीका खोपकर यांनी केली.
यावरुन, “अक्कल कोणाची काढता? तुम्हाला अक्कल आहे का? मी टीव्हीवर सभ्यता सोडून बोलेलो नाही. शिवजयंती साजरी करताय तुमची आहे का ताळ्यावर अक्कल? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही केली ती १९ फेब्रुवारीला साजरी. असं का बोलताय? हे शिकवलं आहे का शिवाजी महाराजांनी?,”असा सवाल मिटकरी यांनी खोपकर यांना विचारला.
या प्रश्नाचे उत्तर देत . “तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन तरी तिथीनुसार साजरा होतो का? आणि आम्हाला राजकारण करायचं नाही सांगता तुम्ही. तुम्हाला काय शिकवण दिलीय दिसतंय. आहो मी एवढा मोठा नाहीय ओ. महाराज आपल्यासाठी दैवत आहे,” असे खोपकर म्हणाले. यावर पुन्हा “तुमची अक्कल किती आहे मला माहितीय. माझी अक्कल काढू नका. अक्कल नाही काढायची. मला एवढचं उत्तर पाहिजे होतं,” असे मिटकरींनी खोपकर यांना सुनावले.
तसेच “आमचं पण दैवत आहे शिवाजी महाराज. तुम्ही ठेका घेतलाय का शिवाजी महाराजांचा?” असाही सवाल यावेळी खोपकर यांना विचारला गेला. यावर “तुम्हाला कळलं पाहिजे शिवाजी महाराज दैवत आहे ते. तुम्ही माझ्या वाढदिवसावर कुठे गेलात?,” असा प्रतीप्रश्न खोपकर यांनी मिटकरींना केला. हे ऐकताच, कॅमेरावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संपूर्ण महाराष्ट्राला लाइव्ह सांगा असे आवाहन मिटकरींनी खोपकर यांना केले.
या आवाहनावर थोड्या वेळात लाइव्ह बघा आमचा कार्यक्रम असे खोपकर यांनी मिटकरींना सांगितले. मात्र “सांगा ना पाठ नाही म्हणून. माझी अक्कल काढतायत. तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे मला,” अशा शब्दात मिटकरींनी खोपर यांना सुनावले. यावर राग व्यक्त करत, “तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. कसल्या गोष्टीवर राजकारण करताय, लाज वाटली पाहिजे तुम्हाला,” असे खोपकर यांनी म्हटले.
यानंतर “महाराष्ट्राने लक्षात ठेवावं ज्यांची राजमुद्रा पाठ नाही ते आमची अक्कल काढतायत,” असे मिटकरांनी खोपकर यांना म्हटले. यावेळी काहीही प्रतिक्रिया न देत तुम्ही आमचा कार्यक्रम लाईव्ह बघा असे खोपकर यांनी सांगितले. या दोघांमधील हा वाद बराच काळ सुरु होता. शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन राजकिय वर्तुळात आता नवीन वाद सुरू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘गली बॉय’ फेम रॅपर धर्मेश परमारचं दुःखद निधन; वयाच्या 24 व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास
मरण आलं पण न्याय नाही मिळाला; लेकीसाठी झगडणाऱ्या बापाचा दुर्दैवी अंत, शेवटपर्यंत प्रशासनाने केलं दुर्लक्ष
१०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले, तरी ब्लेडचे डिझाइन आजही तसेच का आहे माहितीये का?
लहान मुलांच्या झोक्यावर खेळण्याची मस्ती तरुणांना पडली महागात; व्हिडिओ पाहाल तर हसून-हसून लोटपोट व्हाल