Raj Thackeray Vs BJP : राज्यात हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाला विरोध वाढतच चालला आहे. नुकतीच शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठी घोषणा करत, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकत्रित मोर्चा 5 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचे जाहीर केलं. त्याच वेळी, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते आणि नवी मुंबई (Navi Mumbai) शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांनी दावा केला आहे की, हिंदी सक्तीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी रविराज दिवाकर बोटले (Raviraj Diwakar Botle) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गजानन काळे यांचे ट्वीट झाले चर्चेचा विषय
गजानन काळे यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्यांनी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने हिंदी सक्तीच्या विरोधात राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, “हिंदी सक्तीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनाही सरकारचा हा निर्णय मान्य नाही. आता तरी भाजपमधील ‘भैय्ये’ ऐकणार आहेत का? भाजपातील स्वाभिमानी मराठी पदाधिकाऱ्यांनी 5 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावं.”
पदाचा राजीनामा देत राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा
गजानन काळे यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये रविराज बोटले (Raviraj Botle) यांनी लिहिलं आहे की, “राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्ष – दिवा शिळ मंडळ कायदा सेल संयोजक (BJP – Diva Shil Mandal Legal Cell) या पदाचा राजीनामा देतो. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, मी एक मराठी माणूस म्हणून त्यांना पाठिंबा देतो आणि 5 जुलैच्या मराठी भाषेच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहे.”
हिंदी सक्ती विरोधात भाजप पदाधिकारी यांनी दिला राजीनामा …
भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सुद्धा हिंदी सक्ती चा निर्णय मान्य नाही …
आता तरी भाजप चे भैय्ये ऐकणार आहेत का?
भाजपातील स्वाभिमानी मराठी पदाधिकारी यांना आवाहन …मोर्च्यात या .. pic.twitter.com/VJTjEYnt4i— Gajanan Kale (@MeGajananKale) June 27, 2025
मनसे-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याच्या घोषणेनंतर मनसे (MNS) आणि शिवसेना (UBT) गोटात आनंदाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधून आलेल्या राजीनाम्यामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठी अस्मितेसाठी सुरू झालेल्या या चळवळीत आता इतर मराठी भाषिक पदाधिकारी देखील सहभागी होतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.