राजकारणात कोण – कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, असं बोललं जातं. ते अगदी खरचं..! राज्याच्या राजकारणात मनसेची भूमिका कायमच निर्णायक ठरलेली आपण पाहिलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे.
याचबरोबर ते भाजपला देखील घेरताना पाहायला मिळतात. अनेकदा राज ठाकरे यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लक्ष केलं आहे. राज्याच्या राजकारणात मनसे सर्व पक्षांना शह देताना पाहायला मिळत आहे. मात्र सांगलीत चित्र काहीस वेगळं पाहायला मिळालं.
एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या ‘मनसे-भाजप’ने चक्क एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बहुचर्चित ‘ढवळी’ येथील विकास सोसायटी निवडणुकीत ‘मनसे-भाजप’ने राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धूळ चारत सत्ता मिळवली आहे.
यामुळे राजकीय वर्तुळासह सांगली जिल्ह्यातील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. ‘ढवळी’ येथील विकास सोसायटी निवडणुकीत ‘शिवशंभो ग्रामविकास पॅनल’ च्या माध्यमातून भाजपचे रमेश पाटील व मनसेचे शिलेदार अमोल काळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक एकत्र लढण्यात आली होती.
‘मनसे-भाजप’ पॅनल ला ११ जागांवर विजय तर, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल ला ०२ जागांवर समाधान मानावे लागले. ‘रमेश पाटील, धोंडीराम पाटील, सोमनाथ चव्हाण, अशोक कोकाटे, किसन जाधव, मनोहर पाटील, भिमराव माने, रामचंद्र काळे, विमल खोत, अलका पाटील, पोपट खरात, हे सर्व ‘शिवशंभो पॅनल’चे उमेदवार विजयी झाले आहेत.
दरम्यान, ‘मनसे वृत्तांत अधिकृत’ या फेसबुक पेजवरून मनसेने विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर भावी वाटचालीसाठी उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर दुसरीकडे आता आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मनसेची भूमिका नेमकी काय असेल? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आशा भोसलेंनी सांगितला अमेरिकेतील ‘तो’ भयावह प्रसंग; म्हणाल्या, तेव्हापासून मी मुलांना….
पुन्हा ‘तो’ येतोय! राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले मोठे विधान
मराठमोळ्या लूकमध्ये सजली सचिनची लेक सारा; साडी, टिकली, नथ, गजरा आणि बरंच काही..; पहा फोटो
आजपासून सुरू होणार महिला आयपीएलचा थरार, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहायचे हे सामने