mns angry on who oppose firecrackers | महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. गरीबाच्या झोपडीपासून मोठमोठ्या बंगल्यांमध्येही दिवे, लायटिंग पाहायला मिळत असते. पण प्रत्येकवेळी चर्चेचा विषय असतो तो म्हणजे फटाके.
दिवाळीत फटाके उडवण्यावरुन नेहमीच वाद होत असतो. अनेकांचे म्हणणे असे आहे की फटाक्यामुळे वायु प्रदुषण आणि ध्वनी प्रदुषण होते. त्यामुळे हे फटाके उडवले नाही पाहिजे. पण काही लोकांना फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी केली असे वाटत नाही.
काही ठिकाणी तर फटाक्यांवर बंदी सुद्धा घालण्यात आली आहे. आता फटाके उडविण्यास विरोध करणाऱ्यांना मनसेने चांगलेच सुनावले आहे. दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय साजरा केला जाऊ शकत नाही, असे मनसेचे म्हणणे आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक ट्विट केले आहे.
प्रत्येक ठिकाणी फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. पण होणाऱ्या वायु आणि ध्वनी प्रदुषणामुळे अनेकजण फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करताना दिसून येत आहे. आता अशी मागणी करणाऱ्यांना मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत सुनावले आहे.
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1584803281963843584?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584803281963843584%7Ctwgr%5E2179ea5abec7304abcc5c8b3f4747b114fb47f75%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Fwe-are-suffering-from-bhonga-laudspeaker-then-you-too-must-bear-firecrackers-for-4-days-mns-ameya-khopkar-warn-to-muslim-a601%2F
ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, असे ट्विट खोपकर यांनी केले आहे.
दरम्यान, दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी घातली आहे. असे असले तरी अनेकांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली आहे. पण त्याचा परीणाम दिल्लीच्या झाल्याचा पाहायला मिळाला. दिवाळीनंतर हवेची पातळी धोकादायक श्रेणीत पोहचली होती. जनपथमध्ये सकाळी एक्युआय ४४६ सह गंभीर श्रेणीवर पोहचला होता.