Share

…तेव्हा स्वत:ची जागा राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंना दान केली होती, त्याला मेहरबानी म्हणतात; मनसेने सुनावलं

raj - udhav thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा मांडला होता. या मुद्यावर राज्यात वाद निर्माण झाला आहे. तसेच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्रही लिहिले होते. त्यात राज ठाकरेंनी मनसैनिकांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला होता. तसेच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही राज ठाकरेंनी म्हटले होते. (mns angry on uddhav thackeray)

राज ठाकरेंच्या या पत्रानंतर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी या वादात उडी घेतली. तसेच टीका करत त्यांनी राज ठाकरेंना सुनावले होते. अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही ही उद्धव साहेबांची मेहरबानी राज साहेबांनी विसरू नये , सहनशीलता ही निवडणुकीत दाखवायची असते. स्वयंघोषित हिंदुजननायक करून ताम्रपट मिळत नाही, असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले होते.

आता दीपाली सय्यद यांच्या या ट्विटला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. दीपाली सय्यद यांना मेहरबानी या शब्दाचा अर्थ माहित नाहीये, असे मनसेने म्हटले आहे. तसेच राज ठाकरेंमध्ये सर्वांना बाळासाहेब दिसत होते. पण स्वत:च्या हक्काची जागा राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंना दान केली होती, याला मेहरबानी म्हणतात, असे मनसेने म्हटले आहे. मनसेच्या एक फेसबूक पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/100052233024363/posts/pfbid0pWCxLAZrf9UhuNTn5AihahLUSpMTHnZ3UcDtMnJ21qnGx6XKqbwNzPdkfNVeeWU8l/

फेसबूक पोस्ट-
दीपाली सय्यद नावाच्या एक बाई जाणूनबुजून- ‘सुपारी’ घेतल्याप्रमाणे मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे आणि नेते श्री. अमितजी ठाकरे यांच्यावर बिनबुडाची टीका करत आहेत. आज तर त्यांनी हद्दच केली. “अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही हि उद्धव साहेबांची मेहरबानी राज साहेबांनी विसरू नये” असा नवीन ‘उपदेश’शोध त्यांनी लावला आहे. कदाचित त्यांना ‘मेहरबानी’ या शब्दाचा अर्थ माहीत नसेल.

मेहरबानी या शब्दाचा अर्थ त्यांना नीट समजावा यासाठी मी त्यांना (आणि त्यांना ही सुपारी देणाऱ्यांना) समजेल असं उदाहरण देतो.सक्रिय राजकारणाचा कोणताही पुरेसा अनुभव गाठीशी नसताना, फोटोग्राफी करत जंगलात फिरणाऱ्या श्री. उध्दव ठाकरे यांना कै. श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार- उत्तराधिकारी व्हायचं होतं. तेव्हा शिवसेनेच्या राजकारणात सक्रिय होऊन राजसाहेबांना दीड दशक झालं होतं. अक्षरशः शेकडो सभा घेत राजसाहेबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता, अनेकदा. अवघा महाराष्ट्र तेव्हा राजसाहेबांमध्ये ‘पुढचे बाळासाहेब’ – ‘पुढचे शिवसेनाप्रमुख’ बघत होता.

तेव्हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या प्रेमाखातर शिवसेनेच्या तथाकथित ऐतिहासिक महाबळेश्वर अधिवेशनात श्री. राजसाहेब ठाकरे यांनी “श्री. उद्धव ठाकरे यांना शिवसेना कार्याध्यक्ष बनवण्यात यावं” यासाठीचा ठराव मांडला होता. स्वतःच्या हक्काची जागा दुसऱ्याला ‘दान’ केली जाते त्याला म्हणतात, ‘मेहरबानी’! खूप मोठं- विशाल हृदय लागतं त्याला!!

या उदाहरणाने अक्कल आली नसेल तर सय्यदबाईंसाठी आणखी एक उदाहरण देतो, त्यांच्या लाडक्या आदित्यचं. ‘ठाकरे’ घराण्यातला आदित्य विधानसभा निवडणुकीत निर्विघ्नपणे निवडून यावा, यासाठी श्री. राजसाहेब ठाकरे यांनी वरळीत मनसेचा उमेदवार दिला नव्हता. मनसेचे उमेदवार श्री. संतोष धुरी यांनी तेव्हा निवडणूक लढवली असती तर हा ‘आदित्य’ वरळीतच कायमचा मावळला असता! याला म्हणतात, ‘मेहरबानी’!! समजलं?

महत्वाच्या बातम्या-
सलमानच्या घरात आणखी एका जोडप्याचा घटस्फोट; साहील खानने बायको सिमाला दिला घटस्फोट
सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून? राणांचा ठाकरेंना सवाल
“उद्धव ठाकरेंना हिंदुजननायक म्हटलं तर कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण?”

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now