mns and shivsena workers join shinde group in nashik | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटात अनेक मोठमोठे नेते जाताना दिसून येत आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी दोन्ही ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकलाच सुरुंग लावले आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच मनसेत सुद्धा खळबळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता, १२ पेक्षा जास्त आमदार, खासदार अशी ताकद नाशिकमध्ये शिवसेनेची होती. एकेकाळी नाशिक हा शिवसेनेसोबतच मनसेचाही बालेकिल्ला मानला जात होता.
आता दोन्ही ठाकरेंच्या याच बालेकिल्ल्यात शिंदेंनी सुरुंग लावली आहे. ठाकरेंच्या गटातील अनेक नेत्यांसोबतच मनसे नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश घेताना दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मनसे नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहे. त्यामुळे ही पडझड रोखण्यासाठी मनसेकडून अमित ठाकरे यांना नाशिकला पाठवण्यात आले होते. तर ठाकरे गटाकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांना नाशिकला पाठवण्यात आले होते. पण दोघांनाही कार्यकर्त्यांना थांबवणं अवघड झालं आहे.
अमित ठाकरे हे नाशिकमध्ये असताना त्यांच्या पक्षातील माजी नगरसेवकासह काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता याचा महानगपालिकेच्या निवडणूकीवर काय परिणाम होईल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक हा एकेकाळी शिवसेनेचा आणि मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. याच नाशिकमधून मनसेला ३ आमदार आणि ४० नगरसेवक मिळाले होते. पण मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदे गटात सामील होत असल्यामुळे दोन्ही ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
jitendra awhad : ‘१ जानेवारीला भीमा कोरेगावला आलात तर तुमचा खिमा होईल’; जितेंद्र आव्हाडांचा ‘या’ लोकांना थेट इशारा
माझ्या मृत्यूस ‘ते’ चौघे जण जबाबदार, मृतदेहाच्या अंतर्वस्त्रात चिठ्ठी आढळल्याने हिंगोली हादरलं
12 बायका आणि 102 मुले पैदा केल्यानंतर पठ्ठ्याला आली सुबुद्धी, आता करणार ‘कुटुंब नियोजन’