महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची नुकतीच एका तरूणाची ऑडियो क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. या तरुणाला शोधून आता मनसेच्या पदधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. इतकेच करुन न थांबता तरुणाला उघडे करुन अधिकाऱ्यांनी त्याची धिंड सुध्दा काढली आहे. मुख्य म्हणजे तरुणावर महिलेशी असभ्य बोलल्याचा आरोप मनसे अधिकाऱ्यांनी लावला आहे.
या सर्व घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणावर आणि मनसे अधिकाऱ्यांवर सुध्दा गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे हे प्रकरण जास्तच चिघळायला सुरुवात झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणाऱ्या एका महिलेने “एम्पॉवर एचआर सर्व्हिस” या कंपनीची जाहिरात पाहून लेखनाचा प्रोजेक्ट हाती घेतला होता.
यानंतर हा प्रोजेक्ट पुर्ण करुन महिलेने कंपणीत जमा केला. परंतु या प्रोजेक्टमध्ये कंपणीने अनेक चुका काढल्या. कंपणीशी संबंधीत असणाऱ्या तरुणाने महिलेला कामाचे पैसे देण्यास नकार दिला. यावर महिलेने तरुणाला पुन्हा फोन केला. परंतु यावेळी तरुणाने आपली हद्द पार करत महिलेविषयी अपशब्द वापरले.
https://www.facebook.com/100004490016290/posts/2055089007984080/?sfnsn=wiwspmo
सांगण्यात येते की, महिलेशी बोलताना तरुणाने राज ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. तसेच काही कारण नसताना राज ठाकरेंवर शिवीगाळ केली. पुढे जाऊन हे सर्व प्रकरण मनसे अधिकाऱ्यांना समजले. यानंतर त्यांनी तरुणाला शोधून त्याला चांगलीच मारहाण केली. तसेच त्याची रस्त्यावरून धिंड काढली. शेवटी तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
यादरम्यान मनसे कार्यालयाबाहेर चांगलीच गर्दी जमा झाली. तरुणाला मारहाण केल्याचे व्हिडीओ स्वतः मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेअर केले आहेत. व्हिडीओत साफ दिसत आहे की, तरुणाला मनसे कार्यकर्ते मारहाण करत आहेत. तसेच त्याला शिवीगाळ सुध्दा करण्यात येत आहे.
या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून तरुणाच्या विरोधात कलम 509 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी 8 ते 10 मनसे कार्यकर्त्यांवर गर्दी जमवून, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.