Share

आमदार संतोष बांगर संतापले, शिवीगाळ करत थेट लगावली कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत आले आहेत. बंडखोरी करत संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. नंतरच्या काळात बंडखोर आमदारांवर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठत होती. त्यावेळी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानशिलात लावा, असा आदेशच संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना दिला अन् चर्चांना उधाण आले. (MLA Santosh Bangar got angry)

आता आमदार संतोष बांगर यांनी एका उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात भडकावली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे. कामगारांसाठी मध्यान भोजनाची व्यवस्था या उपहारगृहात केली जात आहे. मात्र त्याचा अत्यंत निकृष्ट दर्जा असल्याचे पाहून बांगर भडकले.

हिंगोलीतील कामगारांसाठी असलेल्या एका उपहारगृहाला आमदार बांगर यांनी भेट दिली. त्यावेळी अन्नपदार्थांमध्ये पडलेल्या आळ्या, माशा त्यांनी बघितल्या आणि आमदार बांगर यांच्या संतापाचा पारा चढला.

उपहारगृह व्यवस्थापकाला याबाबत विचारणा केली असता, चुकून झाले, असे परत होणार नाही, हे त्याने बोलताच आमदार संतोष बांगर यांनी रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली.

अन्न पुरवण्याची जबाबदारी असणाऱ्या संबंधित कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिले जातात. शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूचा कोणताही अवलंब न करता कामगारांना जेवण दिले जात होते. या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी आमदार बांगर यांनी यावेळी केली.

कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असून यामधून आर्थिक स्वार्थ साधला जात आहे. संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार बांगर यांनी केली. मात्र व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्यामुळे आमदार बांगर चांगलेच चर्चेत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
साहेबांना पाहताच क्षणी मला समजलं की.., विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा धक्कादायक खुलासा
Karan Mehra: आता ‘ही’ अभिनेत्री सांगणार करण मेहराबद्दलचे संपुर्ण सत्य, निशा रावलच्या विरोधात देणार साक्ष
जर लोकांनी निवडून दिलं असेल तर.., मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे सणसणीत उत्तर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now