Share

bachu kadu : “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

devendra fadanvis bachchu kadu

bachu kadu : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि भाजप आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. कडू यांनी खोके घेतला असल्याचा आरोप राणा यांनी केला. अन् त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. दोघांमधील वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी गेला.

याच प्रकरणी काल दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोघांच्या भेटीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले की, बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहटीला गेले होते. त्यांना मी स्वत: फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे. तुम्ही आम्हाला हवे आहात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रूपमध्ये यावं, असा खुलासा फडणवीस यांनी केला.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, बच्चू कडू हे माझ्या एका कॉलवर गुवाहटीला गेले. त्यामुळे बच्चू कडूंनी कुणाशी सौदा केला. काही उलटसुलट केलं असा आरोप करणं चुकीचं आहे. माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. जे लोकं गुवाहटीला गेले ते सर्व शिंदे यांच्यावर विश्वास ठेवूनच गेले होते.’

दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, काल बच्चू कडू आणि रवी राणा यांनी मान्य केलं की, जी वक्तव्य त्यांच्याकडून झाली, ती रागात झाली आणि ती योग्य नव्हती. मात्र, आता दोघांनीही ठरवलं आहे, की अशा प्रकारे आरोप करणं योग्य नाही. त्यामुळे हा विषय आत संपलेला आहे.’

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now