Share

धोका देणार्‍यांचे राज्य आहे, जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार; मंत्रीपद नाकारल्यावर बच्चू कडू भडकले

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. नंदनवन बंगल्यावर झालेल्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी आपण नाराज असल्याचे सांगितले आहे.(MLA Bachu Kadu said that he was upset)

‘धोका देईल तोच मोठा नेता असतो. त्याला मंत्रीपद मिळते,’ असा उपहासात्मक टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘जो शेवटी येतो त्याला पहिल्या पंगतीला बसवलं.’

‘जो पहिला आला त्याला शेवटी बसवलं. पण याची काहीच नाराजी नाही. राजकारणात असं होत राहतं. तेवढे समजूतदार आम्ही आहोत. मुळात मंत्रिपदासाठी आम्ही शिंदेंसोबत गेलेलो नव्हतो,’ असं बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘धोका देणार्‍यांचे राज्य आहे. जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार. धोका दिल्याने अनेक पक्ष मोठे झाले. भाजप, सेना असो व इतर कोणता पक्ष बंडखोरी सगळीकडे झाली आहे. कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत? बंडखोरांचचं राज्य आहे. बंडखोरी करून येतो त्याला मंत्रीपद मिळतं.’

पुढे बच्चू कडू असे म्हणाले की, ‘नाराज नाही असं नाही थोडी नाराजी आहे. पण एवढे नाराज नाही आहोत की, स्वतःचा पक्ष सोडून दुसरीकडे जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार झाला असता आणि मंत्रीपद मिळाले नसते तर गोष्ट वेगळी असती,’ असंही बच्चू कडू यांनी यावेळी बोलून दाखवले.

‘काही विशिष्ट मुद्द्यांमुळे शिंदेंना पाठिंबा दिला होता. ते मुद्दे विचारात घेतले नाही तर वेगळा विचार करू, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला मंत्री पद देऊ, असे आश्वासन दिले होते. पहिल्या यादीत नाही तर शेवटच्या यादीत तरी नाव असेल,’ अशी अपेक्षा यावेळी बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-
The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’मधील चंदू चायवाल्याचे चमकले नशीब, ‘या’ वेब सिरीजमधून करणार पदार्पण
Amitabh Bachchan: …जेव्हा युजर्स बिग बींना म्हणाले, ‘तुम्ही समजता कोण स्वतःला? अमिताभ बच्चन असाल पण तुमच्या घरी’
Urvashi Rautela: २ बायका ४ मुलं असलेल्या सिंगरने उर्वशी रौतेलालं केलं प्रपोज, अभिनेत्री म्हणाली, असा निर्णय…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now