आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन; कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट

खानापूर आपटी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. शोभा बाबर यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. (MLA Anil Babar’s wife passes away)

शोभा बाबर यांच्या तब्येतीकडे त्यांची मुले व पती अनिल बाबर हे लक्ष ठेवून होते. परंतु उपचारादरम्यान आज सकाळी दहाच्या सुमारास शोभा बाबर यांची वयाच्या ६२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. बाबर कुटुंबावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आमदार अनिल बाबर हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात सामील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुणे दौऱ्याच्या दरम्यान दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन बाबर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस मुख्यमंत्र्यांनी केली.
खानापूरच्या जनतेवर मायेची पाखर घालणाऱ्या लाडक्या काकी हरवल्याची भावना तालुक्यातील सर्व लोकांकडून व्यक्त होत आहे. शोभा बाबर यांच्या जाण्याने खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी सकाळी शोभा बाबर निधन झाल्याचे वृत्त समोर आले. शोभा बाबर यांनी आमदार अनिल बाबर यांना राजकीय वाटचालीत खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शोभा बाबर यांच्या पश्चात त्यांचे पती आमदार अनिल बाबर, मुलगा सुहास बाबर जिल्हा परिषद उपसभापती, मुलगा अमोल बाबर माजी नगरसेवक तसेच दिर, जाऊ असा मोठा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या-
गणेशोत्सवात शेवटच्या ५ दिवसांत रात्री १२ पर्यंत साऊंड सिस्टीम वाजवता येणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वकीलांचा खणखणीत युक्तिवाद; शिंदे गटाचे टेन्शन वाढले
Hrithik Roshan: रोशन पिता-पुत्राच्या जोडीने दिले अनेक हिट चित्रपट, पण ‘हे’ चित्रपट झाले इंटरनॅशनल फ्लॉप