बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Mithun Chakraborty And Hema Malini) नुकतीच छोट्या पडद्यावरील ‘हुनरबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसून आले. या शोदरम्यान दोघेही ९० च्या दशकातील प्रसिद्ध ‘ड्रीम गर्ल’ या गाण्यावर डान्स करताना दिसून आले. यासंदर्भातला प्रोमो जेव्हा समोर आला तेव्हा तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
परंतु, आता एकत्र डान्स करताना दिसणारे हे दोन्ही कलाकार एकेकाळी एकमेकांचं तोंडदेखील पाहत नव्हते. हेमामालिनी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात एक अशी घटना घडली होती ज्यामुळे दोघांनीही एकमेकांसोबत अबोला धरला होता. काय होती ती घटना? जाणून घेऊया त्याबद्दल.
ऐंशीच्या दशकात मिथुन चक्रवर्ती मोठे स्टार होते. तसेच हेमा मालिनीसुद्धा प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. १९८९ साली हेमा मालिनी आणि मिथुन चक्रवर्ती ‘गलियों की बादशाह’ नावाच्या चित्रपटात एकत्र काम करत होते. या चित्रपटासाठी हेमा आणि मिथुन यांच्यात अनेक बोल्ड सीन चित्रित करण्यात आले होते. परंतु, नंतर काही कारणाने ते सीन्स चित्रपटातून वगळण्यात आले होते.
तेव्हाच्या मीडिया रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती यांनी दिग्दर्शकांना सांगितले होते की, चित्रपटात हेमा मालिनीपेक्षा त्यांचे सीन अधिक ठेवण्यात यावे आणि हेमाचे काही सीन्ससुद्धा चित्रपटातून काढून टाकण्यात यावे. मिथुन चक्रवर्ती यांनी दिग्दर्शकांसोबत केलेल्या या संवादाबाबत जेव्हा हेमामालिनी यांना माहिती मिळाली तेव्हा त्या खूपच नाराज झाल्या होत्या.
बातम्यांनुसार, मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत चित्रित करण्यात आलेले सीन काढून टाकण्यात आल्याने हेमा मालिनी खूपच संतापल्या होत्या. चित्रपटात जर सीन्स ठेवायचेच नव्हते तेव्हा ते का चित्रित करण्यात आले? असे म्हणत त्या दिग्दर्शक आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चिढल्या होत्या. तसेच त्यांनी या प्रकाराला ‘हे शोषण आहे’ असेदेखील म्हटले होते.
असे सांगितले जाते की, यामुळे हेमा मालिनी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यानंतर हेमा मालिनी आणि मिथुन चक्रवर्ती एकमेकांशी बोलणे बंद केले. अनेक वर्ष त्या दोघांनी एकमेकांशी अबोला धरला. परंतु, वेळेनुसार दोघांमधील नाते पुन्हा सुधरत गेले. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास तयार झाले.
महत्त्वाच्या बातम्या :
हा आवाज कुणाचा? राज ठाकरेंचा…; ‘या’ चित्रपटातून राज ठाकरेंची चित्रपटक्षेत्रात दमदार एन्ट्री
वयाच्या ४५ व्या वर्षीही अमिषा पटेलचा बोल्डनेस कायम, फक्त टी शर्टवर असताना शेअर केला व्हिडीओ
मुलासोबत शाहरूखला चित्रपटात करायचे आहे काम पण येतोय ‘हा’ मोठा अडथळा