Share

मिस युनिव्हर्स हरनाझ ‘या’ गंभीर आजाराने आहे ग्रस्त; झपाट्याने वाढतंय वजन, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

तब्बल 21 वर्षांनी भारताला ‘मिस युनिव्हर्स’ चा किताब जिंकून देणारी भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू सध्या प्रचंड चर्चेत येत आहे. हरनाझचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत वाढलेल्या तिच्या वजनामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. यावर आता हरनाझने तिच्या वाढत्या वजनाचे कारण देत तिला झालेल्या आजाराची माहिती दिली आहे.

भारताने तब्बल 21 वर्षाने ‘मिस युनिव्हर्स 2021’ चा ‘किताब जिंकला. हरनाझ संधू या ‘मिस युनिव्हर्स 2021’ या मुकुटाची मानकरी ठरली. हरनाझचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती ट्रोल होत आहे. यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. यावर आता हरनाझने मौन सोडलं आहे.

एका मुलाखतीत तिला लोकांनी ट्रोल करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर हरनाझने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. म्हणाली, मला ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. मी माझ्या शरीराचा आदर करते.

तसेच म्हणाली, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप मला पुसता देखील येतात. मी बॉडी शेमिंग करणाऱ्यांचा तिरस्कार करते. मला Celiac नावाचा आजार आहे. अनेक लोकांना माहिती नाही, पण मला ग्लूटेनची अँलर्जी आहे. ग्लूटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटीनचा एक भाग आहे. असे ती म्हणाली.

तसेच, या आजाराबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना म्हणाली, ग्लूटेन गहू, जव, तांदूळसारख्या पदार्थांमध्ये असतात. ग्लुटेन गरम झाल्यावर त्यातला चिकटपणा जास्त वाढतो. ग्लूटेनमुळे आरोग्याला नुकसान पोहोचतं. या आजारामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते. हा आतड्यासंबंधीचा एक आजार आहे असे तिने सांगितले.

तिच्या या उत्तराने आता ट्रोल करणाऱ्यांना चांगलाच चपराक बसला आहे. तिचे चाहते तिच्या या आजारामुळे काळजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, हरनाझचे जे फोटो व्हायरल झाले होते ते एका लॅक्मे फॅशन वीकमधील होते. या कार्यक्रमाला तिनं हजेरी लावलेली होती. त्यावेळी तिचं वाढलेले वजन पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं.

इतर

Join WhatsApp

Join Now