हिंदी प्रेक्षकांकडून वेब सिरीजचा बाप असलेल्या ‘मिर्झापूर’ या सिरीजला भरभरून प्रेम मिळाले आहे. या वेब सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमधील डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यातच आता या सिरीजच्या तिसऱ्या सिझनबद्दल चर्चा होताना दिसत आहे.
‘मिर्झापूर’ चा तिसरा सिझन लवकरच रिलीज होणार असल्याने चाहत्यांनमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकेतच, रसिका दुग्गलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. आता गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजलने या सिरीज संदर्भात केलेली पोस्ट चर्चेत येत आहे.
सोशल मीडियावर गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजलची झलक पाहायला मिळत आहे. त्यानं गुरुवारी ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सिझनची घोषणा केली. त्यानं यासंदर्भात व्हिडीओ केला आहे. यावेळी गुड्डू भैय्याच्या फोटोपेक्षा त्यानं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनची अधिक चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने भयानक डायलॉगही मारला आहे. गुड्डू भैय्याने सोशल मीडियावर दाखवलेली झलक पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्याच्या व्हिडीओला अनेक लाईक मिळाले आहेत.
गुड्डू भैय्याने स्वतःचा हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘आणि सुरू झाले आहे. तयारी, रिहर्सल, वाचन… हे सर्व समोर ठेवा. आता लाठ्या नाहीत, आता खालून चपला आणि वरून बंदूक फायर होतील, लावा हाथ आणि कमाव कंटाप गुड्डू येतोय, स्वतः हून’
विशेष म्हणजे, या पोस्टवर चाहत्यांआधी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी अधिक उत्साह दाखवला आहे. अली फजलची गर्लफ्रेंड रिचा चड्ढा देखील खूप उत्साहित दिसत आहे. तिने या पोस्टवर एक हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. अली फजल 2018 सालापासून या शोमध्ये दिसला आहे.