शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलिवूडचे सर्वात आवडते जोडपे मानले जाते. शाहिद हा बॉलिवूडचा मोठा स्टार असला तरी मीरा राजपूत त्याच्यापेक्षा कमी नाही. मीराला सोशल मीडिया क्वीन म्हणणे चुकीचे ठरणार नाही, तिच्या पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आजकाल शाहिद आणि मीराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आपल्या पतीसोबत कीस करताना दिसत आहे.(Mira Rajput, Shahid Kapoor, Kiss, Social Media, Viral Videos)
शाहिद आणि मीरा (Shahid Mira Video) दररोज त्यांचे रोमांटीक क्षण सोशल मिडियावर शेअर करत असतात आणि त्याच दरम्यान आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद आणि मीरा एका पार्टीत डान्स करताना दिसत आहेत आणि तेव्हाच मीरा शाहिदला आपल्याकडे खेचते आणि त्याचे चुंबन घेते.
शाहिद मीराच्या या क्यूट व्हिडिओवर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला सांगतो, शाहिदने (Shahid Kappor Wedding) २०१५ साली दिल्लीची मुलगी मीरा राजपूतसोबत अरेंज मॅरेज केले होते. शाहिदचे अशा प्रकारे अरेंज्ड मॅरेज अनेकांना धक्कादायक होते, कारण शाहिदचे नाव अनेक बॉलीवूड सौंदर्यवतींशी जोडले गेले होते आणि तो केवळ बॉलिवूड अभिनेत्रीशीच लग्न करेल अशी अपेक्षा होती.
मीरा शाहिदपेक्षा एक-दोन वर्षांनी लहान नाही, तर त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे आणि त्यांचे लग्न झाले तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. दोघेही दोन मुलांचे पालक झाले आहेत. शाहिद आणि मीरा यांची पहिली भेट एका सत्संगात झाली होती. शाहिद त्याचे वडील पंकज कपूर यांच्यासोबत सतत दिल्लीत सत्संग करत असे.
या सत्संगात मीराचे कुटुंबीयही ये-जा करत असत. दोन्ही कुटुंबातील बॉन्डिंग वाढल्यावर नातं निर्माण झाल्याची चर्चा रंगली आणि कुटुंबांच्या या मिलनातून शाहिद आणि मीरा यांची भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर पंकज कपूरने मीराच्या कुटुंबीयांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि त्यानंतर दोघांनी सात फेरे घेत एकमेकांसोबत लग्न केल.
महत्वाच्या बातम्या
कन्हैयालालची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा, पाठलाग केला अन्…
अक्षय कुमारसोबत काम का करत नाही? शाहरूख म्हणाला, मी जेव्हा झोपायला जातो तेव्हा तो..
अचानक ओरडण्याचा आवाज आला अन्.., कन्हैयालालला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने सांगितला थरारक घटनाक्रम