Share

मंत्र्याचा दौरा…’घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर’; महाराष्ट्राचे वाटोळे करणारे हेच अडाणी लोक

शिंदे सरकारमधील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या दौऱ्याच्या या वेळापत्रकावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी खिल्ली उडवली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी तानाजी सावंत यांच्या मुंबई-ठाणे- रायगड- पुणे जिल्हा दौरा कार्यक्रमाची खिल्ली उडवली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी तानाजी सावंत यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक आपल्या फेसबुक अकाउंट वर शेअर करत खोचक टीका केली आहे.

सावंत यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक शेअर करत,  ‘हा किती कामाचा दौरा आहे पहा, महाराष्ट्राचे वाटोळे करणारे हेच अडाणी लोक घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर,’ असे कॅप्शन देत रुपाली पाटील ठोंबरे यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे.

रुपाली पाटील यांनी आता कॅप्शन मधील काही मजकूर काढून टाकत फक्त मंत्री महोदयाचा दौरा घर ते कार्यालयाने कार्यालय ते घर.. एवढेच ठेवले आहे. रुपाली यांच्या या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विरोधक यावरून शिंदे सरकारची खिल्ली उडवत आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid036F9peHufD4fiAJB9tkpnSecZMrMKwpFPkkh6PRiFszotreWzHX4cgFMaWQMWJ7Etl&id=100044602476673

सावंत यांचा २६ ते २८ ऑगस्ट असा तीन दिवसीय दौरा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांचा निवासस्थान ते कार्यालय असेच नियोजन जास्त वेळापत्रकात दिसून येत आहे. यामुळे रूपाली पाटलांनी त्यांच्या या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांकडून देखील मंत्री सावंत यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, तानाजी सावंत शिंदे गटात गेल्याने त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेत्यांकडून सावंत यांना सातत्याने लक्ष केले जात आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्येही विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now