Share

१५ रुपयांच्या कणसासाठी मंत्र्याने घातली दुकानदाराशी हुज्जत; म्हणाले, केवढं महाग विकतो, पाहा व्हिडीओ

केंद्रीय मंत्र्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील मांडला भागातील आहे या व्हिडीओत मंत्री आपली गाडी थांबवत रस्त्यावर विक्रीला असणारं मकेचं कणीस खरेदी करण्यासाठी खाली उतरताना दिसत आहेत. मात्र, कणीस खरेदी करताना ते असं काही बोलले ज्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

रस्त्यावर विक्रीला असणारं मकेचं कणीस खरेदी करणारे हे केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते आहेत. रस्त्यावरची मका खरेदी करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मकेच्या कणसाची किंमत ऐकून ते चकीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओत दिसत आहे की, मंत्री फग्गन सिंग कुलस्ते गाडीतून प्रवास करत असताना, त्यांना रस्त्याच्या कडेला एक तरुण मकेची भाजलेली कणसं विकताना दिसला. हे पाहून त्यांनी गाडी थांबवली, आणि मका खरेदी करण्यासाठी तरुणाकडे गेले.

यावेळी मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी तरुणाला मक्याचा भाव विचारला. तरुणाने १५ रुपये किंमत सांगितली. ही किंमत ऐकून मंत्री चकित झाले, ते म्हणाले की इथं फुकट मिळतं, आणि इतकं महाग विकतो? केवढं महाग आहे? त्यांच्या या वक्तव्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

 

वास्तविक, जेव्हा तरुणाने भाजलेल्या तीन कणसाची किंमत ४५ रुपये सांगितली. तेव्हा मंत्री म्हणाले, ४५ रुपये एवढं महाग? तरुण म्हणाला तुम्हाला वाटेल मी तुमची गाडी पाहून किंमत जास्त सांगितली, पण तसं नाही. त्यावर मंत्री म्हणाले, इथे कणीस फुकट भेटते. त्यावर तरुण गालात हसला आणि म्हणाला आम्ही ५ रुपयाला एक कणीस खरेदी करून आणतो.

या व्हिडीओवरती भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, फग्गन सिंग कुलस्ते यांनी त्या तरुणाला मागणीपेक्षा अधिक पैसे दिले आहेत. पण काँग्रेस विनाकारण याचा मुद्दा बनवत आहे. काँग्रेसची हीच मानसिकता आहे असे नरोत्तम मिश्रा म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now