Share

बाबो! गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांनी खाल्ले एवढ्या लाखांचे जेवण, वाचा बिलाची यादी

गुवाहाटी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये आठ दिवस तळ ठोकून बसलेल्या शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या आमदारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने संपूर्ण बिल भरले आहे. ही माहिती हॉटेल रेडिसन ब्लूकडून समोर आली आहे. मात्र, किती बिल आले याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.(Eknath Shinde, Hotel Radisson Blu, Guwahati, MLA)

सूत्रांकडून माहिती समोर आली आहे की, किमान ६८ ते ७० लाख रुपये भाडे भरण्यात आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या वेगवेगळ्या मजल्यांवर एकूण ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. यासह, हॉटेल व्यवस्थापनाने २२ जून ते २९ जून या कालावधीत बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी रेस्टॉरंट, मेजवानी आणि सुविधा बंद ठेवल्या होत्या.

हॉटेलशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले की, महाराष्ट्रातील आमदार सामान्य पाहुण्यांप्रमाणे येथे थांबले. त्यांच्या वतीने संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, या अधिकाऱ्याने बिलाची रक्कम सांगण्यास नकार दिला आहे. मात्र, आमदारांना सुपीरियर आणि डिलक्स श्रेणीतील खोल्यांमध्ये बसवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

हॉटेल रॅडिसन ब्लूच्या वेबसाईटनुसार, वेगवेगळ्या रूमचे भाडे डायनॅमिक असते, म्हणजेच फ्लाइट तिकिटांप्रमाणेच त्यांच्या किमतीही उपलब्धतेच्या आधारे निश्चित केल्या जातात. सूत्रांनुसार, हॉटेलच्या रूमचे भाडे साधारणपणे ७५०० ते ८५०० पर्यंत असते. हे सवलत आणि करासह सुमारे ६८ लाखांपर्यंत जाते. सोबतच त्यांच्या ८ दिवसांच्या जेवणावर २२ लाख रुपये खर्च होत आहेत.

आमदारांनी इतर काही सुविधा घेतल्या आहेत का, असा प्रश्न हॉटेल अधिकाऱ्यांना विचारला असता, त्यांनी स्पा इत्यादी अतिरिक्त खर्चाच्या सेवांचा लाभ घेतला नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आमदार २२ जूनपासून मुंबईपासून २७०० किमी अंतरावर असलेल्या गुवाहाटी येथे थांबले होते. हे सर्व आमदार बुधवारी गोव्याला गेले आहेत. रॅडिसन ब्लू हॉटेल हे ईशान्येतील एकमेव पंचतारांकित हॉटेल आहे.

महत्वाच्या बातम्या-
उद्या मुंबईत येणार आणि…; एकनाथ शिंदेंची गुवाहाटीतून मोठी घोषणा
शिंदेंनी राऊतांचं घरच फोडलं? संजय राऊतांचा सख्खा भाऊ गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत
शिवसेनेला भगदाड! उदय सामंत काल उद्धवसाहेबांसोबत बैठकीत अन् आज गुवाहाटीत 
गुवाहाटीतून ४० आमदारांचे मृतदेह येतील; संजय राऊतांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now