आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांना आज सर्वोच्च न्यायालायने मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालायाने संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावत त्यांना दिलासा द्यायला नकार दिला. सर्वोच्च न्यायालायाने आमदार नितेश राणे यांना दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश दिले आहेत.(milind nravekar tweet on nitesh rane bail rejected by supreme court)
सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्देशानंतर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर(Milind Narvekar) यांनी खोचक ट्वीट केले आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता ‘लघु सुक्ष्म दिलासा’ असे ट्वीट केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या खात्याची जबाबदारी आहे. यावरून मिलिंद नार्वेकर यांनी हे ट्विट केले आहे.
शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने या ट्विटवर व्यक्त होताना, तुम्ही मातोश्रीचे घरगडी आहात का?’ असा प्रश्न विचारला आहे. तर दुसरा व्यक्ती म्हणाला की, ‘सत्तेचा गैरवापर करून सरकारी पैशाने मोठे वकील देऊन नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, नितेश राणे लाचारांना पुरून उरतील.’
नारायण राणे यांचे सुपूत्र भाजप आमदार नितेश राणे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच शिवसेनेवर टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनासाठी बसलेल्या नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे विधीमंडळात प्रवेश करताना मांजरीचा आवाज काढला होता. या घटनेचे पडसाद विधीमंडळात देखील उमटले होते.
आज सर्वोच्च न्यायालायात आमदार नितेश राणे यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आज ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी नितेश राणे यांच्यावतीने युक्तिवाद केला आणि सरकारच्या बाजूने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.
यावेळी नितेश राणे यांच्या विरोधातील कारवाई चुकीची आहे. नितेश राणे यांच्याविरोधातील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा नितेश राणेंचे वकील मुकूल रोहतोगी यांनी केला. नितेश राणे यांच्याविरोधातील गुन्हे राजकीय नसून इतर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास होणे आवश्यक असल्याने अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकील सिंघवी यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :-
महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही; विरोधक आक्रमक
खऱ्या आयुष्यातील बजरंगी भाईजान, आतापर्यंत ६०० हून जास्त बेपत्ता मुलांना पोहोचवलंय घरी
..त्यामुळे अभिनय सोडून बॉबी देओलला करावे लागले नाईट क्लबमध्ये काम, कठीण काळात पत्नीने दिली साथ