milind narvekar : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. हे सांगण्याच कारण म्हणजे, राज्यात सत्तांतर झाल्यापासून मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेत्यांमधील जवळीक वाढली असल्याचं पाहायला मिळल.
तर दुसरीकडे नुकतच शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी नार्वेकर हे शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नार्वेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.
तसेच शिंदे गटातील अनेक नेत्यांनी नार्वेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल भाष्य केलं. यामुळे नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं बोललं जातं होतं. मात्र असं असलं तरी देखील चित्र काहीस वेगळं पाहायला मिळतं आहे. नार्वेकर ठाकरे गटात राहणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
नार्वेकर हे रविवारी रात्री अचानक शिवाजी पार्कवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी याबद्दल खुद्द नार्वेकर यांनी सकाळी एक ट्विट केले. आपल्या ट्विटमधून नार्वेकर यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर सुरु असलेल्या दसरा मेळाव्याच्या तयारीची छायाचित्रे शेअर केली आहेत.
तसेच नार्वेकर यांनी दसरा मेळाव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाची पाहणी केली. यामुळे आता नार्वेकर ठाकरे गटातच राहणार असल्याचं तूर्तास स्पष्ट झालं आहे. नार्वेकर हे शिवतीर्थावर जाऊन तुर्तास पक्षांतराच्या सर्व चर्चांना विराम दिला आहे. यामुळे आता शिंदे गटाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जातात. मात्र असं असलं तरी देखील काही दिवसांपासून ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने ठाकरे गटात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तरी या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे.