milind narvekar talk about tejas thackeray | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे शिवसेना आता खिळखिळी झाली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे सुद्धा राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे.
तेजस ठाकरे यांच्याबद्दल सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. अशातच आज तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे सचिव आणि ठाकरे कुटुंबियांचे सर्वात विश्वासू सल्लागार मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केले आहे.
नार्वेकर यांनी ट्विट करत तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तरुण आणि प्रतिभावान तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वन्यजीवनात नवे शोध लावण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा, असे मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना शुभेच्छा देताना ते राजकारणात येणार असल्याचा कोणाताही उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी तेजस ठाकरे राजकीय प्रवेशाबाबत कोणते भाष्य करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
काही वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर खुप कमी काळातच ते आता स्थिरावलेले दिसून येत आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी बंडखोरांनाही सुनावले होते. तसेच ते आता महाराष्ट्र दौरा करतानाही दिसून येत आहे.
शिवसेनेतील अनेक मोठ्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला एका आक्रमक नेत्याची गरज आहे. त्या आशेने तेजस ठाकरे यांच्याकडे बघितले जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता तेजस ठाकरे हे शिवसेनेसाठी हुकमी एक्का ठरु शकतात.
महत्वाच्या बातम्या-
Uday Samant: शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू; केसरकरांना प्रवक्ते पदावरून काढल्याच्या चर्चेवर सामंतांनी थोपटले दंड
Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर तुम्ही राज्यभर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्यला सवाल
Esha Gupta: लॉन्जरी शोमध्ये ईशा गुप्ताचा दिसला सेक्सी अवतार, व्हिडिओ पाहून नेटकरी सुद्धा झाले घामाघूम