shinde group : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांत नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी देखील झाल्या होत्या. यामुळे आता नार्वेकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याचं बोललं जातं आहे.
अशातच शिंदे गटातील एका मंत्र्याने याबद्दल खुलासा केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली.
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबद्दल भाष्य केलं. नार्वेकर यांच्या शिंदे गटातील प्रवाशाबद्दल बोलताना शिंदे यांनी म्हंटल आहे की, ‘मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येणार की नाही माहीत नाही,’ असं म्हणतं शिंदे यांनी याबाबत उत्तर देणं टाळलं आहे.
त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या असून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील नार्वेकर हे शिंदे गटात जाणार नसल्याच स्पष्ट केलं. तर आता खुद्द नार्वेकर यांनी एक सूचक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
नार्वेकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.
”दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे. शिर्डीतील 150 शिवसैनिकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे सध्या ठाकरे गटात खळबळ उडाली असून उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ